राजाभाऊंनी काल वाशी येथे पुलाखाली एका वहातुक पोलीसाला एक साधा, सोपा, सरळ प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर त्या दोघांनाही ठावुक होते.
"काय हो तुम्ही बाहेरुन येणारी गाडी, प्रवासी घ्यायला थांबली की लगेच त्यांना पकडता , पण या येथे समोर कोपऱ्यावर राजरोसपणे ह्या खाजगी गाड्या प्रवासी भरण्याचा बेकायदेशीर धंदा करतत, अगदी तुमच्या समोर हे एजंट लोक ’पुणॆ, पुणॆ " करत ओरडत असतात , त्यांना तुम्ही काहीच करत का नाहीत ? "
राजाभाऊंच्या तोंडाकडॆ ते हवालदार बघत राहिले व काहीही न बोलता पुढे निघुन गेले.
वाशी ते पुणॆ , एशियाड , वोल्वो सेवा, महामंडळाने उपलब्ध करुन दिली तर (चांगल्या न खडखडणाऱ्या गाड्या) ! , दादर - पुणे च्या धर्तीवर वाशी-पुणे योग्य दरात टॅक्सी सेवा सुरु झाली तर !
कशाला प्रवासी या धोकादायक आणि अव्याच्यासवा दर सांगणाऱ्या, मेंढरे भरल्यागत गाडीत माणसे कोंबणाऱ्या खतरनाक माणसांच्या नादी लागतील ?
1 comment:
khare aahe. mi hi maajhya blog var vaahtuk polisabaddal ek lihila aahe nakki paha.
Post a Comment