मन नुसत जळतय. या राजाभाऊंनी आयुष्य कधी गंभीरपणॆ घेतलेच नाही.
पुण्यात एकेका विभागात पायी हिंडत असता एकेकांची घरे, बंगले किंवा तो एरीया बघुन जीवाला त्रास होतो, आपण कधीच पुढचा विचार काय किंबहुना विचारच कधी केला नाही याचा. आणि विचार केलच तर तो अंमलात आणॆपर्यंत जग फार पुढे निघुन गेलेले असते याचा.
राजाभाऊंची एक सवय आहे , बायकोला घेवुन शहरात मग ते कोणतेही असो, पायी हिंडुन फिरत पहाण्याची. त्या शिवाय ते शहर कळत नाही असा त्यांचा सिद्धांत.. एखादा विभाग घ्यायचा मग पाय नेतील तेथे कुचे , गलीयां मधुन स्वत:ला वाहवत न्यायचे.
आज संध्याकाळी घरकुल लॉन मधुन ते मग चालता चालता पटवर्धन बागेत शिरले आणि मग पुढे जात नवसह्याद्रीतुन बाहेर पडले. काय मस्त परिसर आहे.
काश .....
3 comments:
Malahi toh area awadato
आता राजाराम पुलामुळे नवसह्याद्री आणि कर्वेनगर भागाकडून सिंहगड मार्गाकडे तिथे खूप वाहतुक आहे. पण १०-१५ वर्षांआधी नवसह्याद्री ते विठ्ठल मंदिर एवढाच भाग होता. पूल नव्हता, त्या सेतूचं बांधकामही सुरु झालं नव्हतं. विठ्ठल मंदिर ते नदी या भागात आपण एकोणीसाव्या शतकात आहोत असं वाटवणारी शांतता होती. आज़ही शोधल्यास असे भाग पुण्यात सापडतील. पण एकूण पुण्याचा बकालपणा वाढला आहे हेही खोटं नाही.
काश ऐसा कोई मंजर होता...
Post a Comment