१९७८-७९ चा काळ, श्री.सोमनाथ समेळांनी रायगड प्रदक्षिणा आयोजीत केली होती. राजाभाऊंची ही पहिली सह्यमोहीम. नेमकी त्याच रात्री त्रिपुरी पोर्णिमा होती.
प्रदक्षिणा घालतांना त्या अरुंद वाटॆवर ती पुढे चालली होती, चालता चालता तिला त्यांचा पाय लागला, ते सॉरी म्हणाले.
"ट्रेकवर या असल्या फॉर्मलिटीज पाळायच्या नाहीत "
तिने बजावले. ती ग्रुप लिडर होती. त्या गर्दीत परत, परत तीन चार वेळा याचे पुनरावृती झाली.
तिला वाटॆल हा मुद्दाम पाय मारतो की काय , म्हणुन ते पुढे निघुन गेले. आता लाथा खाण्याची व हा डायलॉग मारण्याची त्यांची पाळी होती. सवयीने ती पण नकळत सॉरी म्हणुन गेली.
" का हो आता का ? " अणि मग दोघे खळखळुन हसले. त्यांना एक चांगली मैत्रीण मिळाली,
छानपैकी त्यांच्या चार पाच जणांच ग्रुप जमला, मग त्या चांदण्यारात्री त्यांनी रायगड चढायचे ठरवले, टपोरे लख्ख चांदणे , संपुर्ण किल्ला त्या चंद्रपकाशात पाहुन झाला, रात्र, पहाट मोहमयी होती.
तिच्यामुळे या गिर्यारोहणाच्या दुनियेची त्यांना माहिती मिळाली, ते भटकंतीस जावु लागले.
दरम्यान ती लग्न होवुन परदेशी गेली, त्यांचा संपर्क टुटला.
मग अचानक कधीतरी त्यांना कळाले , बाळंतपणात मुलाला जन्म देवुन ती हे जग सोडुन गेली.
दर वर्षी त्रिपुरी पोर्णिमेला हे दिवस आठवतातच.
2 comments:
chataka lavanara anubhav ahe.
hya postachya nimittane ek geenral comment deto, ki tumache post na chukata vachale jatat. comment nahi dili tari apala post hamakhas ughadun vacahvasa vattoch.
keep it up!
कोहम,
खरच , तिची आठवण आली की वाईट वाटते, वयाच्या ऐन पंचविशीय एका लाघवी मुलीचा मृत्यु व्ह्यायला नको होता.
माझा ब्लॉग नियमीतपणे वाचत असल्याबद्दल धन्यवाद.
Post a Comment