Tuesday, November 03, 2009

माननीय राजसाहेब

आई एकवीरा आपली कुलदेवता. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर प्रथम आईच्या दर्शनाला , तिचा आशिर्वाद घ्यायला आपण आपल्या तेरा आमदारांना घेवुन गेलात.


त्या कार्लागडाचे माझ्या लहान पुतणीने काढलेले हे फोटो,

या आईच्या निवासस्थानाची तिच्या भक्तगणांनी वाट लावली आहे. साऱ्या डोंगरावर प्लास्ट्किच्या पिशव्यांच्या, कापलेल्या कोंबड्यांच्या पिसांचा, नारळाच्या शेंब्यांचा, कचराचा विळखा बसला आहे.

आपल्या कुलदेवतेच्या गडाचे रुप आपल्या आदेशाने पालटो ही आईच्या चरणी प्रार्थना. ह्या देवळाचे स्वरुप, रुप, रंग देखील बदलण्याची गरज आहे. काय त्या देवळाभोवती कोणताही विचार न करता विद्रुप लोखंडी जाळ्यांचे पिंजरे उभारले आहेत, काय तो देवळाला रंग फासुन ठेवला आहे.

या कार्लापरिसराचे , तिथल्या अद्वितीय, प्राचीन, साऱ्या जगात या प्रकारची एकमेव असलेल्या बौध्द लेण्याचे भान ठेवुन नुतनीकरण करणे फार आवश्यक आहे.

आपण मनावर घेतले तर हे होण्यासारखे आहे.

5 comments:

अपर्णा said...

अवस्था बघवत नाही. पुर्वी जेव्हा मी ट्रेकिंगला जायचे तेव्हा प्रत्येकवेळी प्लास्टिक उचलुन जिथे कचरापेटी मिळेल तिथे टाकण्याचे काम करायचो. आपण सर्वांनीच मुळात कचरा असा कुठेही टाकण्याची प्रवृत्ती सोडली पाहिजे...

जय घोलप said...

Its request to you,please loged your this query to http://www.manase.org/ site to Raj.....Your query will definetly solve over there......

जय घोलप said...

Its request to you,please loged your this query to http://www.manase.org/ site to Raj.....Your query will definetly solve over there......

Narendra prabhu said...

छान, हा सुर्य हा जयंरथ असं कचर्‍याचं दर्शन झालं. निर्मळ वातावरणातच देवाची वसती असते हे कधी कळणार आपल्याला?

HAREKRISHNAJI said...

अपर्णा,

ही खरच दयनीय अवस्था आहे. दुर्दैव असे की या कार्ला येथील अद्वितीय प्राचीन वारसा लाभलेले ही अप्रतिम लेणी असलेल्या डोंगराचे डंपींग ग्राउंड मधे रुपांतर केले आहे.

जय ,

खर म्हणजे या गोष्टी डोंगर चढतांनाच आपल्या नेत्यांच्या लक्षात यायला पाहिजेत.