Tuesday, December 14, 2021

 राजाभाऊ, ब्बास पुरे झालं आता, हात जरा आवरता घ्या.

राजाभाऊंनी आपल्या मनाला फटकारले. आज आपल्या मनाला त्यांनी जरा जास्तच दटावले. अहो, राजाभाऊ, स्टाटर्स ते श्रीखंड व्हाया सॅलॅडस या खाद्यप्रवासात अजुन पर्यंत किती तरी टप्पे बाकी आहेत, एकीकडेच तुम्ही एवढा वेळ रेंगाळत राहिलात तर सर्व पदार्थांना तुम्ही कसा काय न्याय मिळवुन देणार ?

श्रीखंड हा पदार्थ मुख्य जेवणात तर हाणण्यासारखाच असतोच याबद्द्ल वाद नाही पण त्यापेक्षा जास्त तो डेझर्ट्स म्हणुन खाल्यावर अधिक चांगला लागतो.

मुंबईवरुन सकाळी अश्या वेळी निघायचे की मग जेवणाच्या वेळी पुण्यात पोचता आले पाहिजे. राजाभाऊंचे धोरण.

बुफे जेवण म्हणजे राजाभाऊंचे अत्यंत परमप्रिय. मुंबईवरुन जातांना तीन हॉटेल्स बुफे जेवणासाठी त्यांची ठरलेली. वाकड व हिंजेवडीत असलेली. "मोमो कॅफे - कोर्टयार्ड बाय मॅरीयट", "बझ - ताज विवांता " आणि "पोर्टीको- सयाजी "

हायवेला जवळ असल्यामुळे येथे जेवायला थांबणे सोईस्कर पडते तसेच  https://www.nearbuy.com/pune ह्या बेबसाईट वर त्यांच्या ऑफर असल्यामुळे तेथे जेवणे हे काहीसे स्वस्तपण पडते.

असेच एकदा "पोर्टीको - सयाजी" मधे. बुफेची मजा लुटतांना.

अप्रतिम. बढीया.

जर पुण्यात मस्तपैकी बफे कुठे जेवायला जायचे असा सल्ला जर का कोणी राजाभाऊंना विचारला ( जो कधी कोणी विचारण्याच्या फंदात पडत नाही, उगीच कशाला ...... ) तर ते प्रथम "सयाजी" चे नाव घेतील. एक तर इतरांच्या मानाने स्वस्त आणि तरी देखील मस्त, अनेक प्रकारच्या पदार्थांनी खच्चुन भरलेला, काय खावु नी काय नाही असे होते.

"हवे तेवढे खा " हे जरी असले तरी पोटाला जेवतांना पण कधी तरी थांबायलाच लागते.




















No comments: