राजाभाऊंच्याने रहावेना, जेवणाची वेळ होईपर्यंत धीर धरवेना.
एखादा खाद्यपदार्थ शिजल्याशिजल्या खाण्यात काय मजा असते आणि तो जर का मातीच्या भांड्यात शिजवलेला असेल तर ती काही ओर असते.
रविवारी "उधियुं" चा बेत करायचा हे आधी ठरलेले होतेच आणि तो कशात करायचा हे ही.
जव्हारला गेलो असतांना बाजारामधे हवी तशी मातांची भांडी दिसली नाहीत, मन आणि पोट जरासे खट्टु झाले खरे, पण काळेकाकुंचे लक्ष मात्र अगदीच बारकाईचे, अगदी मग ते नवऱ्यावर पण का असेना एका दुकानात मिळाली खरी.
आजचा "उंधियो" मातीचा एक खास सुंगध घेवुन आला आहे.
जव्हारला गेल्यानंतर एक असा विचार समोर आला की आता आपण येथुन नाशिकला जावे. तेवढीच मजा, गाडी चालवण्याची.
अणि नाही म्हटले तरी नाशिकला "ताज" मधे जेवायला जाण्याची एक सुप्त इच्छा होतीच.
हा सारा परिसर राजाभाऊंच्या का कोण जाणे पण आवडीचा, ह्या परिसराला चहुअंगाने भिडुन झालेले. कदाचित जेव्हा पहिल्यांदा एका पावसाळ्यात विहिरगाव-वैतरणापुल-खोडाळा-सुर्यबांध-देवबांध अशी बऱ्यापैकी केलेल्या पदभ्रमंतीत ह्या परिसराचे जे रुप मनावर कोरले गेले त्यामुळेही असावा.
पण काल राजाभाऊंच्या नशिबी "ताज" मधे जेवणे नसावे, त्रंबकच्या वाटेवरच मनावर आणि पोटावर भुकेने ताबा मिळवायला सुरवात झाली. अचानक समोर गजानन महाराजांचा आश्रम आला आणि मग राजाभाऊंनी ठरवले आजचा भोजनाचा पडाव येथेच.
अगदीच श्रधाळु नसले म्हणुन काय झाले, देवस्थानी, आश्रमांमधे मिळणारे प्रसादाचे भोजन तसे राजाभाऊंच्या आवडीचे ( कानिफनाथ ला काय मस्त प्रसादाचा शिरा मिळतो, अगदी भरपेट ).
गजानन महाराजांचा आश्रम मस्त आहे. काळेकाकुंना येथे येवुन रहाण्याची फार इच्छा आहे.
No comments:
Post a Comment