ए रामा नायक यांचे उडिपी श्रीकृष्णा बोर्डींग. पुन्हा एकदा.
रविवारी पायसम खाण्याचे राजाभाऊ विसरुनच गेले होते. किंबहुना पालपायसमचा त्यांना विसर पडला होता. "Ap____M " यांनी आठवण करुन दिली आणि राजाभाऊ आज परत रामा नायक मधे पोचले.
अत्यंत साधे , रुचकर असे शुध्द शाकाहारी भोजन मिळण्याचे हे पवित्र स्थान, कोठेही भपका नाही, आरडाओरडा, गोंधळ नाही, अत्यंत शिस्तीत सारे काम चाललेले.
ताटात किंवा केळीच्या पानात , जसे जेवण हवे असेल त्या प्रमाणे पैसे देवुन कुपन घ्या, मग एकजण तुमच्या समोर पाण्याचा पेला, ताकाचा पेला, व दही आणुन ठेवणार व कुपन गोळा करणार, हा झाला संकेत, तुमच्या कडुन कुपन गोळा केल्याचा, जो पर्यंत या तीन गोष्टी समोर दिसत नाहीत तो पर्यंत वाढपी काही तुमच्या समोर ताट ठेवणार नाही.
पडवळ व कोबीची भाजी, चवळीची भाजी, तसेच वांग्याच्या भाजीत चक्क शेवग्याची शेंग. हवे तेवढे सांबार, गरमागरम रसम, जे प्याल्यानंतर तुमचे पोट कसे तापले पाहिजे. दोन मुद भाताच्या, पापड व ताजे केलेले लोणचे.
एखादी भाजी आपल्या नावडती, किंवा विशेष आवडीची नसते. घरी बायकोच्या नावे बोटे मोडत ती खातो, पण तीच भाजी येथे मात्र बोटे चाटत पुसत हाणत रहातो , असे का ?
आज सेमीया पायसम मिळाले. ज्या साठी केला होता अट्टाहास.
माटुंग्याला येथे येण्याचे दुहेरी हेतु असतो. रेल्वेस्थानका जवळ यांचे दुकान आहे, तेथे केळा वेफर्स, बदाम हलवा, आणि मुख्य म्हणजे शुध्द तुपातील म्हैसुर पाक घेणे व खाणे.
No comments:
Post a Comment