Wednesday, December 15, 2021

कॉपर चिमणी

 राजाभाऊंनी कितीही परीपत्रकं काढली , कितीही वटहुकुम काढले तरी त्याची अंमलबजावणी होईलच ह्याचा नेम नाही.

आणि विशेष गंमत म्हणजे हे आदेश धुडकावुन लावायला तेच स्वःत पुढे असतात.

आता कालचंच उदाहारण. 

गेल्याच महिन्यामधे राजाभाऊंनी फतवा काढली होता. आता बंदी, ह्याच्यापुढे बंदी, कायमची बंदी. ह्या नजदीकच्या काळात आपण पुर्वी ज्या भोजनगृहात भोजन केले आहे, ह्या उपहारगृहामधे खाणे खाल्ले आहे तेथे परत म्हणुन जायचे नाही.  अजुन अश्या कैक जागा आहेत जेथे आपण कधीच गेलेलो नाही किंवा का कोण जाणे जाण्याचा विचारही केला नाही. 

पण जेव्हा काल रात्री बाहेर जेवायला जाण्याचे ठरवले गेले तेव्हा राजाभाऊंनी आपल्या सवयीनुसार , आवडीनुसार नेहमीच्याच वरळीच्या "कॉपर चिमणी " मधे जेवायला जाण्याचे सुचवले.  ह्या "कॉपर चिमणी" मधे आतापर्यंत किती वेळा ते जेवायला गेले असतील त्याची मोजदातच होणे नाही, पार पुर्वी "नॅब" च्या जागी असल्यापासुन ते आताच्या ह्या जागेत जाणॆ होत आहे. काय त्यांना तेथल्या जेवणाची एवढी भुरळ पडते ते केवळ तेच जाणे. पण ह्या जागी त्यांच्या खाण्यामधे तसे नाविन्य म्हणुन नाही. हिरवी चटणी, सोबत क्रिस्पी रुमाला रोटी, मकई शीग कबाब, दम आलू सोबत काबुली नान आणि शेवटी व्हे. बिर्याणी.  प्रत्येक वेळी हाच मेन्यु.









मग काय. जोर लगाके, हैय्या, जोर लगाके.

No comments: