क्रिम सेंटर - फर्न - कल्याणी नगर पुणॆ. -अन्नासाठी दशदिशा फिरवीशी निकोलस संता.
शंतनु घोष यांच्या ब्लॉगवर मुंबईमधल्या गिरगाव चौपाटी येथील सुप्रसिद्ध क्रीम सेंटर यांनी पुण्यात शाखा काढल्याचे वाचले आणि राजाभाऊंना तिथे खायला गेल्या शिवाय रहावेना.
नाताळाच्या दिवशी कल्याणी नगर मधे "अवतार" बघायचा व कोठेतरी चांगल्या ठिकाणी सकाळी मस्त पैकी जेवायला जायचे हा बेत ठरला. गोल्ड लॅब ,आइनॉक्स कुठेही चित्रपटाची तिकीटे मिळेना, त्यात भुकेने कासावीस झाल्याने मेंदुला जाणारे सारे सिग्नल्स जॅम . शंतनुंनी लिहलेल्या एकाही रेस्टॉरंटस चे नाव काही आठवेना, एक ढोले पाटील रोड वरचे "सिगरी" सोडुन.
काही जागी जेवायला गेले की का कोण जाणॆ एक प्रकारचा नर्वसनेस येत जातो , तेथे जेवणाची इच्छा होत नाही. "सिगरी"मधे ही तसेच झाले, वाटायला लागले की याची आता उतरती कळा सुरु झाली आहे, जवळजवळ ते सर्व रिकामेच होते, कर्मचारीवर्गाचे मळके कपडॆ खुपायला लागले व मेन्यु वरचे दर टोचायला लागले.
बाजुच्या मेनलॅड चायना मधे तर ते बघायला कबुल नव्हते, खुप चालायला लागले की असे होते बऱ्याच वेळा. दोन तास थांबायला लावु बघत होते. गेले उडत.
मग कोरेगाव पार्क मधे मलाका स्पाईस, सिल्क रुट आदी चांगली उपहारगृह शोधणे झाले , ABC Farm पण बघुन झाले. पण कुठेच जेवावसे वाटत नव्हते.
मग राजाभाऊंच्या मुलाला क्रीम सेंटर आठवले, शोधत शोधत ते तेथे पोचले.
येथले छोले भतुरे एकदम सरस. लहानपणापासुन ते येथे हा पदार्थ खात आले आहेत.
रशियन सॅलड सॅंडवीच त्यांच्या बायकोची आवडती डिश. पुण्यामधे अजुनही मुंबई सारखा चांगला पाव मिळत नाही त्या मुळॆ याची चव पावामुळॆ जरासी वेगळी लागत होती.
मुलांना कधीही जास्त सुट देवु नये, ते दिवाळॆ काढतात. हा छोकरा मग मुक्तहस्ते पदार्थ मागवतच राहिला, ऑनीयन रिंग काय, टॅकोज काय , व्हे. सॅटॆलाईट सिझलर्स, सेझवान व्हे. सिझलर्स, पिंक स्टॅबेरी सोडा, आणि वर सिजलींग ब्राउनी.
एकंदरीत हे रेष्टॉरंट भलतेच महागडॆ आहे, तिघासांठी जवळजवळ १२०० रुपये आणि तेही ही महागाई पोळुन टाकत असतांना म्हणजे खुप झाले.
Old post
No comments:
Post a Comment