अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Friday, December 31, 2010
वृक्षगान
आधीच डॉ.शरदिनी डहाणूकरांनी लिहिलेली पुस्तक वाचणे , एक बहार असतं, त्यात ऐन बसंतात फुललेल्या पांगाऱ्यासमान "वृक्षगान " हाती लागलयं.
यह सरासर नाइन्साफी है राजाभाऊ
राजाभाऊ , आपल्या भाच्याची तारीफ करुन राहिलात आणि ज्या बाईने येणाऱ्या नववर्षाचे स्वागत करायला हा सारा घाट घातला तिच्या बद्द्ल किंवा निदान तिच्याशी तरी आपला चमत्कारीक स्वभाव दुर ठेवुन निदान दोन शब्द तरी
चांगले बोला.
वरची गच्ची.
मस्तपैकी छानसा वारा वाहतो आहे, मस्तपैकी थंडीचा माहोल त्यात जमलेली भट्टी.
बार्बेक्यु. सोबत सुला.
Thursday, December 30, 2010
असावेत काय ?
तर या घोटाळ्याची चौकशी अमुकतमुक सरकारी यंत्रणेकडुन व्हावी, होणार , होत आहे असा ढोल पिटल्यानंतर, गाजावाजा केल्यानंतर यथासावकाश घातल्या गेलेल्या छापात विरुद्ध जाणारे पुरावे केवळ यां यंत्रणेला मिळण्यासाठी त्या गृहस्थाकडुन आपल्या घरात ठेवले जात असावेत काय ?
का पण का ?
२०० करोड, ४०० करोड , १००० करोडचे आर्थिक घोटाळे झाल्याचे वाचनात येते पण या प्रकरणात गायब झालेले, हडपलेले पैसे पै न पै वसुल करुन ते सरकारदरबारी, सरकारच्या तिजोरीत जमा (केवळ परत भ्रष्टाचाऱ्यांकडुन लुटले जाण्यासाठीच ) झाले आहेत असे केव्हाच वाचनात येत नाही .
का पण का ?
आज
आज महाराज असते तर त्यांच्या नावाने हौदस घालणाऱ्यांची , जाळपोळ , तोडफोड करणाऱ्यांची, हाणामाऱ्या करणाऱ्यांची रवानगी त्यांनी नक्की टकमक टोकावर केली का ?
का ते पण या हल्लीच्या सामर्थवान राजकारणी लोकांपुढे हतबल झाले असते ?
जेड गार्डन
जेड गार्डन मधे जेवण खुप छान मिळत असेल असा अंदाज होता.
काल तो अंदाज खरा ठरला.
पण लग्नात नक्की कशामुळे जास्त मजा आली सांगणे कठिण.
काल तो अंदाज खरा ठरला.
पण लग्नात नक्की कशामुळे जास्त मजा आली सांगणे कठिण.
राजाभाऊ तुम्हारे तो भाग खुल गये
ज्याचा भाचा, आज्ञाधारक, कष्टाळु भाचा, लहानपणापासुन शेफ होण्याचे स्वप्न बघतो, घरात चालत आलेल्या क्षेत्रापासुन वेगळी वाट धरतो त्याच्या मामाची मजा असते.
एकाला खाणे परमप्रिय तर दुसऱ्याला बनवणे. क्या कहना.
एकाने फर्माईश करावी , भाच्याने ती पुरी करावी. क्या कहना.
खाणे आणि खाणे.
तकदीर खुल गयी, राजाभाऊ, किस्मत का दरवाजा समझो खुल गया, पोटाचा घेर समझो और बढ गया.
Tuesday, December 28, 2010
काका मला सांग
"काका मला एक सांग तु फिश खात नाहीस, काकी खात नाही, मी पण खात नाही मग आपण फेस्टीवलला कशाला चाललो आहोत ? "
राजाभाऊंच्या पुतणीने बिनतोड सवाल विचारला.
आता काय बोलायचे ?
तिला काय सांगायचे काल कोलीनबाईला तिच्या काकाने उद्याला परत तांदळाची भाकरी खायला येतो म्हणुन कबुल केले आहे.
तिला काय सांगायचे काल कोलीनबाईला तिच्या काकाने उद्याला परत तांदळाची भाकरी खायला येतो म्हणुन कबुल केले आहे.
" काका त्यापेक्षा आपण मॅक मधे जावुया "
चल बाई, तु म्हणशील तसे.
ओबेरॉय मॉल मधे ते गेले खरे पण समोर आला तो कॉपर चिमणीची बोर्ड, कबाब महोत्सव.
रेश्मी पनीर सिग कबाब राहिले बाजुला, पनीर तिक्का झाफरान मागवावे लागले , म्हणे केशरात घोळलेले पनीर.
अजब तेरी दुनिया मेरे मालीक
अजुन कसाब पुख्खे झोडतोय , त्याच्यावर खर्च होणारे करोडो रुपयाच्या मेहरबानीने.
जेव्हा काय होईल ते होईल. अजुन खुप वेळ आहे.
आणि डॉ.बिनायक सेन ना पाठवुन दिले तुरुंगात खडी फोडायला.
मटा नायक २०१० आणि
मटा नायक स्पर्धा आज जाहीर झाली.
यंदाला झालेले घोटाळे लक्षात घेता खरं म्हणजे
"महाघोटाळा नायक २०१० "
अशी स्पर्धा जाहीर व्हायला हवी.
कोण बरं यात पहिला नंबर पटकवणार ?
यंदाला झालेले घोटाळे लक्षात घेता खरं म्हणजे
"महाघोटाळा नायक २०१० "
अशी स्पर्धा जाहीर व्हायला हवी.
कोण बरं यात पहिला नंबर पटकवणार ?
Monday, December 27, 2010
डोलायमान स्थिती होवुन राहिलीय महामत्स्य महोत्सवात
खावु का नको खावु ? खावु का ? का नको ?
नको ? का जरासे चाखुन पाहुया ?
काय हरकत आहे ? कशाला उगाच ?
आपण मत्स्याहार करत नसले तरी काय झाले ?
आयुष्यभर कितीतरी केलेले पण मोडत आलोय.
एखादा तुकडा.
थोडासा , उगीचच , नावाला चाखायला काय हरकत आहे ?
खावु का नको ?
खायचे झाले तर काय खाऊ ?
कोणत्या स्टॉलवर खाऊ आणि कोणत्या कोळीणबाईच्या हातचे खावु ?
एकमात्र नक्की].
गरमागरम मऊसुत, पांढरी शुभ्र, मोठाली तांदळाची भाकरी.
ती कोणत्याही परिस्थितीमधे खायचीच खायची. मग कोरडी का होईना.
अखेरीस राजाभाऊंनी ताव मारला.
आडवा हात चालवला तो उजवीकडच्या शेवटच्या स्टॉलवर अटक मटक चवळी चटक वर.
चवळीची भाजी, लई टेस्टी भाजी, चटकदार, मटकदार आणि त्या सोबत वेडेपिसे करुन राहिलेली तांदळाची भाकरी.
महाराष्ट्र शासन आयोजीत "महामत्स्य महोत्सव ".
बांद्रा-कुर्ला कॉम्लेक्स.
उद्याला शेवटचा दिवस.
आता परत एक भेट उद्याला.
Sunday, December 26, 2010
का पण का ?
एखादी गोष्ट करण्यासाठी आपण जेवढे उत्सुक असतो तेवढ्याच प्रकर्षाने ती नाउत्सुक.
या माजरा मधे शेवट हा नेहमीच ठरलेला असतो. आणि नेहमी तो एकच असतो.
राजाभाऊ आज घरीच बसले आहेत.
तिने केलेली काळ्या वटाण्याची उसळ व वडॆ खात. खास बेत.
वरती " आज मैने तुम्हारे लिये गाजरका हलवा बनाया है "
लाच खावु घातली लालची माणसाला.
बौद्धीक खाद्य की पोटासाठी खाद्य ?
शेवट नेहमीच एकच.
बर्षभर वाट बघितली होती साहित्य संमेलनास एखादा दिवस तरी हजेरी लावण्याची.
एखादी गोष्ट करण्यासाठी आपण जेवढे उत्सुक असतो तेवढ्याच प्रकर्षाने ती नाउत्सुक.
या माजरा मधे शेवट हा नेहमीच ठरलेला असतो. आणि नेहमी तो एकच असतो.
राजाभाऊ आज घरीच बसले आहेत.
तिने केलेली काळ्या वटाण्याची उसळ व वडॆ खात. खास बेत.
वरती " आज मैने तुम्हारे लिये गाजरका हलवा बनाया है "
लाच खावु घातली लालची माणसाला.
बौद्धीक खाद्य की पोटासाठी खाद्य ?
शेवट नेहमीच एकच.
बर्षभर वाट बघितली होती साहित्य संमेलनास एखादा दिवस तरी हजेरी लावण्याची.
का कोण जाणॆ ?
का कोण जाणे, पण काही काही वास्तुचा पायगुणच तसा असतो, या जागेत कोणताही व्यवसाय चालता चालत नाही. दुकान बंद पडते , त्याजागी परत नविन व्यवसाय उघडला जातो तो केवळ बंद पडण्यासाठीच.
जागा अगदी मौक्यावरची असते, कोपऱ्यावरची असते, दरोरोज हजारो, लाखो माणसांची वर्दळ असते, पण एकालाही वाटु नये आत दुकानात शिरुन काही तरी खरेदी करावी ?
आता चर्चगेट स्थानकासमोर या जागी ज्या धंद्याला कधीच मरण नाही अश्या या हॉटॆलच्या धंद्याचे दिवाळे निघण्याची पाळी थोड्याच दिवसात यावी ?
Saturday, December 25, 2010
काळवंडलेले सौंदर्य
मुंबईवर सत्ता गाजवायची दुसऱ्यांच्या भावनांशी खेळत.
या मुंबईवर मात्र प्रेमाची भावना मात्र दाखवायची नाही.
ये दिल बोले नको नको.
कधीकधी पोटानी आपल्या दिलाचे मानले नाही तर मग त्याला पस्तवायला होते. बी. मेरवान कडॆ फक्त मावा सामोसा, मावा केक खावा तर ते सोडुन प्लम केक खायला राजाभाऊ गेले आणि वैतागले. सगळी तोंडाची चव खराब झाली, त्यात परत लालचीपणाने मस्कापाव मागवुन ते राहिले होते.
मग ती चव परत आणायला ते याझदानी मधे ब्रुनमस्का खायला गेले.
ये दिल मांगे मोर
अजुन कापा, अजुन , अजुन , आणखी एक. गरमागरम कोळश्यावर भाजलेले साकरीया, मस्त गोड रताळे आणि वरती भुरभुलेला मसाला. जरासे लिंबु पिळले असते ना तरी चालले असते.
या थंडीच्या दिवसात गाडीवर ही भाजलेली रताळी कोठे मिळतात याचा राजाभाऊ शोध घेतच असतात पण जेव्हा जे हवे असते ते अवचितपणे, नकळतपणे, ध्यानीमनी नसतांना समोर येते तेव्हा बसलेला सुखद धक्का फार चवदार, रुचकर व लाजबाब असतो.
मेरी ख्रिसमस.
रात्रीचे दोन वाजुन गेले आहेत.
राजाभाऊ आणि त्यांचा समस्त परिवार मुंबईमधल्या वांद्राच्या रस्तावरुन फिरताहेत, चक्क अंग्रेजी गाणी ऐकत ऐकत.
मस्तपैकी ह्या सिझनची मजा लुटत.
जल्लोश. निव्वळ आनंददायी माहोल.
नुसता आनंद ओसांडुन चालालाय.
मेरी ख्रिसमस.
नाताळाचा शुभेच्छा.
वाटतच नाहीयं रात्रीचा ही ऐवढी वेळ झाली असेल.
माउंट मेरी चा परिसर तर नुसती खिस्तींनी फुलुन गेलायं,
नाताळाची मजा लुटायला, ख्रिसमस इव्ह चे मिडनाईट मास अटेंड करायला. जिवनाची मजा लुटायला. मस्त माहोल. हवा ही आल्हाददायक. वर्षाचा हा नाताळाचा सण , ही वेळ अगदी छान असते.
माउंट मेरी चा परिसर तर नुसती खिस्तींनी फुलुन गेलायं,
नाताळाची मजा लुटायला, ख्रिसमस इव्ह चे मिडनाईट मास अटेंड करायला. जिवनाची मजा लुटायला. मस्त माहोल. हवा ही आल्हाददायक. वर्षाचा हा नाताळाचा सण , ही वेळ अगदी छान असते.
किती वर्षापासुनची इच्छा होती.
हॉर्नीमन सर्कलकडच्या सेंट थॉमस चर्च मधे मास ला जायचे, छान पैकी कॅरल ऐकत ऐकत येशुची जन्म वेळ साजरी करायची.
आज ती पुरी झाली.
आजची रात्र मुंबई काही झोपणे नाही.
मुंबईचे हे रात्रीचे रुप काही अलगच आहे.
मुंबईचे हे रात्रीचे रुप काही अलगच आहे.
मेरी ख्रिसमस.
Thursday, December 23, 2010
अचानक
अचानक.
अचानक आयुष्यातुन वेळ कुठे गायब झाला आहे देव जाणे.
त्यात परत
मुंबई ते उपनगर.
उपनगर ते मुंबई.
लोकल ट्रेनचा प्रवास.
या प्रवासात काय कंटाळवाणं आहे हे सांगणॆ कठीण.
हा प्रवास वैतागवाणा की यासाठी रेल्वे स्थानकावर आपल्याला हव्या त्या फलटावर जाण्यासाठी पुल चढणे ?
फलटावरच्या फक्त त्या करणाऱ्याच कळणाऱ्या घोषणा " यह आठ बजकर दस मिनिट की बोरीवली जानेवाली बारा डिब्बे की गाडी है ये मुंबई सेंट्रल , दादर, बांद्रा, अंधेरी के बीच किसीभी स्टेशनपर रुकेगी नही " आणि "हमे खेद है आज आठ बजकर दस मिनीटकी बोरीवला जानेवाली जलद लोकल रद्द्द की गयी है . यात्रींयोंकी असुविधा के लिये हमे खेद है " हे ऐकत बसणे त्रासदायक ?
डब्यात शिरतांना , उतरतांना करावयास लागणारी कसरत, अंगमेहनत, प्रचंड गर्दीत घुसत, वाट काढत हे कंटाळवाणे की गाडीत होणाऱ्या " अगला स्टेशन दादर, येणारे स्थानक दादर, नेस्ट स्ट्रेसन इज दादर ? याचा सततचा मारा ?
स्थानकाबाहेर रिक्षा मिळावी म्हणुन लावावी रांग किंवा ती मिळावी म्हणुन धावाधाव करत , चरफडत इतरांवर कुरघोडी करण्याचा निष्फळ प्रयत्न का रिक्षाचालकांची ऐकावी लागणारी नकारघंटी ?
आणि स्थानकाबाहेर माणसे ओकण्यासाठी पुल चढतांना होणारी चेंगराचेंगरी ? की माणसे गिळणाऱयां स्थानकाच्या तोंडी जाणे ?
आणि स्थानकाबाहेर माणसे ओकण्यासाठी पुल चढतांना होणारी चेंगराचेंगरी ? की माणसे गिळणाऱयां स्थानकाच्या तोंडी जाणे ?
Monday, December 20, 2010
Traveller's Tales: Going Shakahari In Style
जेव्हा येवु घातलेल्या नव्या वर्षाचे संकल्प करण्याआधीच संपुष्टात येतात तेव्हा.
या वर्षी पुण्याची पुरते नागवलयं. खिसा आणि पोट दोन्ही खाली आलयं.
आता यापुढे नविन वर्षी बाहेर उपहारगृहात खाणॆ नाही. अजिबात नाही. बिलकुल नाही, केव्हाही नाही. साफ बंद. बंद म्हणजे बंद.
पुरती वाट लागलीय पैश्याची. कधीतरी आवरायला हवं. खिश्याला पडलेले भलेमोठाले भोक आता बुझवतांना नाकीनऊ येणार आहे.
मग श्री. शंतनु घोष यांची " शाकाहारी " वरील ही पोष्ट वाचनात आली. ठाम निश्चय करण्याआधीच डळमळीत होवु लागलायं.
एकदाच, शेवटचे , या पुढे मग कधीही जाणे नाही. फक्त एकवार. एकदाच येथे जेवायला जावु मग त्यानंतर साफ तोंड आवरायचे.
एकच थाळी. सेट मेन्युची एकच थाळी.
हे हॉटॆल सुरु झाल्यापासुन येथे जेवायला जावुजावु म्हणणारे तुम्ही,अहो राजाभाऊ, कसा काय तुम्हाला गेल्या आठवड्यात या "शाकाहारी" चा विसर पडला आणि तुम्ही कल्याणी नगर मधल्या रॉयल ऑर्कीड मधे पोहोचलात ? आणि जेव्हा कळाले की "शाकाहारी" चे दर "रॉयल ऑर्कीड " पेक्षा कमी आहेत तेव्हा तुम्हाला काय वाटले, सांगा सांगा, राजाभाऊ.
एकच प्याला. एकच थाळी, एकच बफे,
मग श्री. शंतनु घोष यांची " शाकाहारी " वरील ही पोष्ट वाचनात आली. ठाम निश्चय करण्याआधीच डळमळीत होवु लागलायं.
एकदाच, शेवटचे , या पुढे मग कधीही जाणे नाही. फक्त एकवार. एकदाच येथे जेवायला जावु मग त्यानंतर साफ तोंड आवरायचे.
एकच थाळी. सेट मेन्युची एकच थाळी.
हे हॉटॆल सुरु झाल्यापासुन येथे जेवायला जावुजावु म्हणणारे तुम्ही,अहो राजाभाऊ, कसा काय तुम्हाला गेल्या आठवड्यात या "शाकाहारी" चा विसर पडला आणि तुम्ही कल्याणी नगर मधल्या रॉयल ऑर्कीड मधे पोहोचलात ? आणि जेव्हा कळाले की "शाकाहारी" चे दर "रॉयल ऑर्कीड " पेक्षा कमी आहेत तेव्हा तुम्हाला काय वाटले, सांगा सांगा, राजाभाऊ.
एकच प्याला. एकच थाळी, एकच बफे,
रंग २ आणि रोमराज्य
कधीतरी का कोण जाणे वाटते, हाती घेतलेले पुस्तक पुढे वाचु नये, मग ते अर्धवट वाचुन तसेच ठेवले जाते.
रंग २ -कमल देसाई.
नाही जमत वाचणॆ. काहीच कळत नाही आहे का ?
रोमराज्य - मीना प्रभु,
अलीकडे मीना प्रभुंची प्रवासवर्णने वाचणे कंटाळवाणे वाटायला लागले आहे, ह्या बाई स्थळ पहाता पहाता त्याबद्दल ताबडतोब ऑन लाईन , फार सविस्तर लिहीत जातात काय ? कसं काय लक्षात रहाते येवढे सारे ? प्रश्न पडुन राहीला आहे. त्यांच्या सर्व पुस्तकातील वर्णने एकसुरी वाटायला लागली आहेत.
असाच कंटाळा तंबी दुराईंच्या "दोन फुल एक हाफ" चा येत चालला आहे. स्थंभ फार लांबत चालला आहे की काय असे वाटायला लागलयं.
असाच कंटाळा तंबी दुराईंच्या "दोन फुल एक हाफ" चा येत चालला आहे. स्थंभ फार लांबत चालला आहे की काय असे वाटायला लागलयं.
Thursday, December 16, 2010
देवा तुझीया द्वारी किती कष्ट ?
एकतर भगवंताने जावुन वर कुठेतरी ध्यानस्थ बसायचे आणि वर भक्तांना दर्शनासाठी येण्याची वाट दुस्तर करुन सोडायची. आता पर्यंत डोंगरमाथ्यावर जावुन बसलेल्या देवतांची मंदिरे ठावुक होती, पण हा काय भलताच प्रकार विष्णुमहाराज करुन राहिले आहेत ?
राजाभाऊंच्यानी काही असे चढवेना, ते आपले खालीच उभे.
पेडगावचे शहाणॆ
तर पेडगावच्या शहाण्यांना घरी स्वस्थ बसणे नाही.
आता पुण्यातुन बाहेर पडायला अनेक रस्ते आहेत त्याला काय करायचे ? सातारा रस्ता, नगर रस्ता, नाशीक रस्ता, सोलापुर रस्ता, मुंबई रस्ता, कुठलीतरी दिशा धरायची आणि सुटावे. सोबत गाडी आणि ती व श्री.सुरेश परांजपे सारखी माहितगार व्यक्ती. सबंध आडव्या उभ्या महाराष्ट्रात एकही असा डोंगर नसेल, डोंगरमाथा नसेल, गाव नसेल, स्थळ नसेल , कानाकोपरा नसेल , धनगरपाडा नसेल, गवळी वाडा नसेल, खिंड नसेल वस्ती नसेल जेथे ते गेलेले नाहीत किंवा त्याची त्यांना माहिती नाही.
मग काय. ते एके दिवशी निघाले पेडगावला बहादुरगड बघायला. पेडगावचा भुईकोट किल्ला. महाराजांनी केलेली औरंगझेबाच्या या दुधभावाची फटफजिती, त्या किल्ल्यात पुरातत्व खात्याला उत्खन्नन करतांना सापडलेली पुरातन मंदिरे.
सिध्दटॆकच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर गाडी वळली ती पेडगावच्या रस्तावर. पंधराएक कि.मी. गेल्यावर मात्र त्यांच्यी पुढे जाण्याची छाती झाली नाही, रस्तादुरुस्तीची कामं चाललेली. हे मोठाले फोडलेले दगड रस्तावर पसरुन ठेवलेले. आडवाटेवर गाडीला काय झाले तर मोठी आफतच. हा अनुभव लक्षात गेता भीमेच्या किनारी असलेल्या काष्टी गावातील वरदविनायकाच्या देवळात जाण्याचे मग रस्ता कसा असेल नी कसा नाही या विचाराने त्यांनी टाळले.
संध्याकाळी परततांना नारायण महाराजांच्या केडगाव बेट ला जाण्याचे मात्र आवर्जुन जाणे झाले.
"बेट" चा आश्रमाचा परिसर मस्त आहे. आतमधले प्रशस्त दत्त मंदिर, मन प्रसन्न करुन सोडणारे, सभोवताली छोट्याश्या टॆकाडावर चढुन गेल्यावर असणारी माळरानं, त्यामधली हरणं. पण सुर्याला नेमके त्याच वेळी मावळायचे होते.
आश्रमात रहाण्यासाठी बंगले मिळतात. ( आतमधे ते कसे आहेत याची कल्पना नाही ). तेथे जावे , निवांत रहावे व आजुबाजुच्या टेकाडांवरुन मस्त पैकी भटकावे. चौफुल्याजवळ मोरगावच्या वाटॆवर हे स्थळ आहे.
आयुष्यातली एक मस्त संध्याकाळ.
चाल चाल चालवणे
अडीच . अडीच महिने. गेल्या अडीच महिन्यात राजाभाऊंच्या गाडीवर कोणत्या कोणत्या गावातील मातीचे थर साठले गेले असतील ते सांगणे महामुश्कील.
अनेक वर्षाच्या मनाच्या गाभाऱ्यात खाली खोलवर कुठेतरी दाबुन ठेवलेल्या इच्छा या अश्या एकाएकी उफाळुन वर आल्या आणि मग काय गाडीला लागलेले चक्र थांबायचे नाव नाही. आधीच ते भटके त्यात ती सात भटकी. कधीच नवऱ्याची कोणतीही गोष्ट ऐकायची नाही असा पण केलेल्या बाईस नवऱ्याची फक्त एकच आज्ञा कळते " उठ आणि चल"
अनेक वर्षाच्या मनाच्या गाभाऱ्यात खाली खोलवर कुठेतरी दाबुन ठेवलेल्या इच्छा या अश्या एकाएकी उफाळुन वर आल्या आणि मग काय गाडीला लागलेले चक्र थांबायचे नाव नाही. आधीच ते भटके त्यात ती सात भटकी. कधीच नवऱ्याची कोणतीही गोष्ट ऐकायची नाही असा पण केलेल्या बाईस नवऱ्याची फक्त एकच आज्ञा कळते " उठ आणि चल"
ऐन तारुण्याच्या नशेत नाशिक परीसरात केलेल्या चांभार लेणी, रामशेज किल्ला ते वाघाड धरण ते पेठ, सुरगाणा " या पदभ्रमंतीत राजाभाऊंना मधुनच वाघाड धरणाकडुन परतायला लागले होते. श्री.सुरेश परांजपे, नाना नित्सुरे हे पुढे गेले होते. तेव्हा पासुन या पेठ, सुरगाणा विभागात फिरायचे होते ( जे वेळेअभावी या वेळीसही राहुन गेले आणि राहुन गेले ते वळण न कळल्यामुळे राजगुरुनगरच्या पेठ अभयारण्यात शिरणे.) नाशकात फिरणे, राजधानी मधे जेवणे, जहागीरदारांकडे बिस्कीटांसाठी जाणॆ, सिन्नरचे गारगोटी संग्रहालय , नाशिक मधले तोफखाना संग्रहालय पहाणे व सापुताऱ्याला जावुन निवांत रहाणे येवढ्यापुरतेच या वेळी सारे सीमीत राहिले.
डांग.
" डांग, बेळगाव, निपाणी आणि कारवार सहीत संपुर्ण महाराष्ट्र झालाच पाहिजे " मधला डांग. गुजराथनी गिळंकृत केलेला डांग व अशी मागणी आपण कधीकाळी केली होती हे मराठी माणसांकडुन विसरला गेलेला डांग.
सापुताऱ्याला दोन गोष्टी फार भावल्या, सापुताऱ्याची मदहोशी थंडी, कचकचुन पडलेली थंडी आणि रात्रीच्या वेळी वीज गेल्यानंतरचे दिसलेले आकाश , खच्चुन ताऱ्यांनी भरलेले आकाश. स्वच्छ आणि निरभ्र. लाखो ताऱ्यांनी उजळुन निघालेले काळोखी आकाश, राजाभाऊ आणि आकाश ह्यामधे कसलाही, अगदी प्रकाशाचा सुद्धा अडथळा नसलेले आकाश आणि ते व त्यांचे आकाश निरीक्षण.
सापुताऱ्याला दोन गोष्टी फार भावल्या, सापुताऱ्याची मदहोशी थंडी, कचकचुन पडलेली थंडी आणि रात्रीच्या वेळी वीज गेल्यानंतरचे दिसलेले आकाश , खच्चुन ताऱ्यांनी भरलेले आकाश. स्वच्छ आणि निरभ्र. लाखो ताऱ्यांनी उजळुन निघालेले काळोखी आकाश, राजाभाऊ आणि आकाश ह्यामधे कसलाही, अगदी प्रकाशाचा सुद्धा अडथळा नसलेले आकाश आणि ते व त्यांचे आकाश निरीक्षण.
सापुताऱ्यात राजाभाऊंना रहायला एक मस्त जागा सापडली. स्वामीनारायण मंदिराच्या आवारात त्यांनी रहाण्यासाठी बांधलेल्या खोल्या. खोल्या, ज्या मंदिराच्या असल्यातरी त्याचे दर मात्र धर्मार्थ नसलेल्या, चांगल्या प्रशस्त खोल्या. आणि रात्रीच्या थंडीत खाल्लेली गरमागरम मुगाच्या डाळीची खिचडी. अजुन दोन चार दिवस रहायला मिळायला पाहिजे होते. तबीयत एकदम फाईन होवुन गेली असती.
मजा आली.
Subscribe to:
Posts (Atom)