Sunday, October 23, 2022

ठाकुरद्वार - गिरगाव- प्रार्थना समाज - चर्नीरोड या पट्यात असंख्य भोजनालयं, उपहारगृह होती

 ठाकुरद्वार - गिरगाव- प्रार्थना समाज - चर्नीरोड या पट्यात असंख्य भोजनालयं, उपहारगृह होती, काळाच्या ओघत कशी, कधी आणि का गायब झाली कळलच नाही. 

ठाकुरद्वारची टेंबेंची खानावळ. राजाभाऊ तेथे कधीच जेवले नसल्यामुळे ह्याच्या बद्द्ल काही बोलु शकत नाही. 

गोविंदाश्रम. एकदोनदाच येथे जेवण झाले, आठवण. जेवणानंतर जे पोटात गोंधळायला सुरवात झाले ते भडाभड वांतीपर्यंत.

मॉडर्न - केळेवाडीच्या समोरचे . येथली ओल्या काजुची उसळ , खरवस फार आवडायचे. 

कोना - बोरभाट लेन - हे जरा अलिकडेच म्हणावे बंद झाले. आठवण अशी काही खास नाही. कधीतरी काहीतरी उदरभरणासाठी गेलो असणार.

अनंताश्रम - अनंताश्रम. कोळ्यांच्या जाळ्यात गावलेले मासे जेव्हा अनंताश्रमामधे जावुन शिजवले, तळले जात असतील तेव्हा त्यांना आपले जीवन सार्थकी लागल्याचा आनंद होत असावा असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. ह्याची ख्याती खुप दुर दुर वर पसरलली. जातीचे खवय्ये येथे आवर्जुन हजेरी लावायचे.

पण. 

हा पण फार मोठा आहे. 

ह्याचा शेवट हे ठिकाण बंद पडण्यातच होणार असे जणु विधीलिखीत होते.  आणि शेवटी तेच झाले.

पुरोहीत - मसालादुध प्यावे ते पुरोहितांकडॆच, बर्फी, दुधीहलवा खावा तो पुरोहितांकडचाच.

विरकर - दोनएक वेळा विरकरांकडे भोजनाचा योग आला. त्यांची जागा  खुप मोठी होती असे अंधुकसे आठवते. पण ज्या अर्थी अजुनही ह्याची आठवण काढली जाते म्हणजे ते खासच असणार. तारुण्यात पदार्पण करण्याच्या वेळी कधीतरी ते बंद झाले. शेवटी शेवटी त्या जागेबद्दल काहीबाही ,  ऐकायला यायचे. खरे खोटे किती ह्याची कधी राजाभाऊंनी शहनिशा केली नाही.

सेंट्रल लंच होम  आणि आशा कॅफे. राजाभाऊंचे येथे वरच्यावर जाणे व्हायचे. उडप्याची उपहारगृह. कॉलेजच्या जवळची. 

दिनेश - दरयुष बेकरी समोरचे हे पंजाबी जेवण मिळणारे ठिकाण राजाभाऊंच्या हक्काचे होते, कॉलेजमधे पडीक असल्यामुळे. स्वस्त आणि मस्त.

केळकर- बनाम हॉल लेनच्या नाक्यावरचे अस्सल मराठमोळी उपहारगृह. इमारतीला लागलेल्या आगीत जळाले, मग इमारत नव्याने उभी राहिली, पण केळकर मात्र नव्या जागेत फारचे रुजु शकले नाहीत.

कुलकर्णी -  बटाटा भजी आणि बटाटा भाजी. केवळ भजी आणि भाजी

सेंट्रल सिनेमाच्या शेजारी - नाव आठवत नाही.

सुनील शेट्टीनी एक पॉश रेस्टॉंरंट काढले, सेंट्रल सिनेमाच्या शेजारी . मिस्चीफ " खुप चांगले , चवदार पंजाबी, मोगलाई जेवण मिळायचे, डायमंड मार्केट मुळे ते फक्त शाकाहारीच होते, संध्याकाळी सुनील शेट्टी वरती असलेल्या ऑफीस मधे येवुन बसायचा. 

मग ते ही बंद झाले, त्याच्या जागी लिटील इटली आणि अश्याच प्रकारचे दुसरे रेस्टॉंरंट आले होते.  बंद झाले. 

या विभागात चार पाच इराणी होते. आता एकदोनच राहिले आहेत. 

इराणी परत केव्हातरी..

Monday, October 17, 2022

Pithale

 So happy to see and eat our "Pithale " in " The Gateway Hotel by Taj "




ज्याची सुरवात गोड त्या दिवसाचा शेवटही गोड होतो का ?

 ज्याची सुरवात गोड त्या दिवसाचा शेवटही गोड होतो का ?

आदर्शच्या जिलेबींनी झालेली सुरवात,

त्यावर आदर्शच्याच बासुंदीचा वर्षाव

संध्याकाळी सुतारफेणी धरणार असेल फेर,

पेढे तर आहेतच नारळाबरोबर खायला

वाट बघतोयं केव्हा येते महालक्ष्मीकडची बर्फी.

आज म्हैसुर पाक खावासा वाटतोय. उद्याला नक्कीच आलेपाक खावा लागणार आहे.

तिवारी मिठाईवाला

 कधीकधी एकाद‍या दुकानात आपल्या आधी उभे असणारे वैताग कंटाळा आणतात, आपल्या सहनशक्‍तीची परिक्षा बघतात.

तिवारी मिठाईवाला. दसऱ्याचा शुभदिन. अफाट गर्दी. राजाभाऊ समोसे आणायला गेलेले. रांगाचरांगा. 

कॅशियर पुढे रांग, मिठाई देणाऱ्यांपुढे, बांधणाऱ्यांपुढे रांग. 

पहिली रांग कॅशियर पुढची. आता चौकश्या करायच्याच झाल्यातर येथे केल्या जावु नयेत, माल, किंमत ही काउंटरवर जावुन पहावे.  पण नाही, चौकश्या काही संपत नाहीत , काय हवं ते काही सांगितलं जात नाही. शेवटी घेतले काय तर दोनशे ग्रॅम पेठे.

दुसरी रांग खाद्‍यपदार्थ घेण्यासाठी. तेहतीस समोसे हवेत, एका पिशवीत आठ, दुसऱ्या पिशवीत पाच, तिसऱ्या  पिशवीत तीन, वेगळ्या पिशवीत बारा. दोन इथे खायला, दोन प्लेट मधे , प्रत्येक पिशवीमधे वेगवेगळ्या चटण्या टाका. आधीच अफाट गर्दी. त्यात ह्या असल्या मागण्या. वर पिशवीवर लिहा आत किती समोसे आहेत ते.  कंट्रोल राजाभाऊ कंट्रोल. भुक आणि राग दोन्ही आवरा. 

परत वर ह्याच सुचना नवरा आणि बायको दोघेही एकाच वेळी देत होते. बांधणाऱ्यांचा गोंधळ, प्रचंड गोंधळ. पिशव्या उघडा , आत पहा किती समोसे आहेत ते. 

राजाभाऊ, कंट्रोल.

सुजाता उपहारगृह

 घराबाहेरच्या कोणी त्यांच्या मनात काय आहे हे सांगितले तर आपल्याला तसा फरक पडत नाही. 

पण  जेव्हा घरातील प्रधानसेवक राजेशभाईंना सकाळी सकाळी "मी मन ची बात सांगु का " असे  म्हणतात तेव्हा मात्र नाही म्हटलं तरी मनात धडकी बसल्यावाचुन रहात नाही.

पण जेव्हा अपेक्षा सांगितल्या जातात तेव्हा जीव कसा ताटात पडतो. इच्छा अगदी माफक असते. पुर्वश्रमीचे "बी.तांबे" आणि आताचे " सुजाता उपहारगृहामधे " जेवायला जायचे असते.

"एक भाकरी, बटाटा सुकी भाजी, डाळींबी, टॉमेटो बटाटा रस्सा भाजी आणि वर डाळभात, सोबत दो वाट्या दही." चक्क ऐश. 

मन तृप्त आणि खिसाही.  परत साधे मराठंमोळ जेवण, पोटाला बाधणे नाही. आहारनियंत्रण ही सोडणे नाही.






Wednesday, October 12, 2022

डोळ्यासमोर मक्याचे कणीस भाजले जातेयं पण चव लागते जणु उकडलेल्या कणसासारखी.

 राजाभाऊंना त्यांच्या डोळ्यानी दगा दिला होता, पण नाकाने बरोबर मार्ग दाखवला.

राजाभाऊंना त्यांच्या डोळ्यानी दगा दिला पण त्यांच्या तोंडाने बरोबर चव जाणली. 

समोरचा माणुस दिसत नाही पण नाक मात्र सांगते आहे इथेच कुठेतरी. 

डोळ्यासमोर मक्याचे कणीस भाजले जातेयं पण चव लागते  जणु उकडलेल्या कणसासारखी. 

एक गृहस्थ रॉक्सी चित्रपटगृहासमोरील पदपथावर आपली चुल घेवुन बसायचे. ते अचानक तेथुन गायब झाले. काही दिवसांनी ते राजाभाऊंना रॉक्सी बाहेर सापडले. मग तेथुन ते परत दिसेनासे झाले होते. मग राजाभाऊंनी ते आपला बोऱ्याबिस्तरा घेवुन गावाला गेले असतील अशी मनाची समजुत करुन घेतली. आणि त्यांचा नाद सोडला.

परवाला रस्तावरुन जातांना गाडी चालवता चालवता अचानक भाजल्या जाणाऱ्या कणसाचा सुवास त्यांच्या नाकी पडला आणि मग काय. 

युरेका , युरेका.

अमेरीकन कॉन. आधी सालासकट चुलीमधे आतल्या भागात खुप वेळ भाजले जाते, मग सालासकट निखाऱ्यावर. सालं काढुन पुन्हा निखाऱ्यावर व्यवस्थित भाजले गेले की मग सुरीने सोलुन त्याचे दाणे काढायचे.

दाण्यांवर दोनपाच प्रकारचे चटकमटक मसाले, लिंबु आणि मस्का मारके झाले की समोर पेश केले जाते त्याची लज्जत लुटायला.

आता ह्यांनी बाजुच्या पदपाथावर आपली चुल मांडली आहे. वयस्कर गृहस्थांची जागा त्यांच्या मुलाने घेतली आहे.

हिचकी

महंगाईके जमानेमे यह क्या हो रहा है?

"हिचकी" नामक रेस्टॉरंटमधे दर मंगळवारी इ.स.१९९० मधे खाद्यपदार्थांचे जे दर होते त्या दरात खाद्यपदार्थ मिळतात. ( १ नोव्हेंबर पर्यंत)

मग काय राजाभाऊंनी ह्या संधीचा फायदा न उठवला तरच नवल. 












बायकोने काढलेला फतवा

 बायकोने काढलेला फतवा मोडायला नाही म्हटंल तरी थोडेफार धाडस लागते ते मात्र खरं.

रात्रीच्या वेळी रस्तात एका हातात कागदाची पुडी व त्यातला पदार्थ खातांना ब्रम्हानंदी लागलेली टाळी. 

असा एखादा जाडजुड माणुस पहाण्यात आला तर खुशाल समझावे राजाभाऊ राजाभाऊ म्हणतात ते हेच.

या दिवसात कुठेतरी गाडी उभी असते, एक चुल. त्यात भाजलेली गरमागरम रताळी. 

वर भुरभुरलेला मसाला. जरासे लिंबु त्यावर पिळले असते तर बहार आली असती.

नेमके अश्याच वेळी "बाहेर काही खाऊन येवु नको, घरी तुझ्या आवडीचा पदार्थ केला आहे " य सांगण्याचा नेमका कसा विसर पडलेला असतो ?

स्टेटस

 कधी कधी अचानक राजाभाऊंच्या डोक्यात सणक येते. 

भरपुर सांबार ओरपायची हुक्की येते. 

नेहमीच सर्व ठिकाणी डोसे हा मुख्य पदार्थ व त्यासोबत मग मिळणारी इवलीशी चटणी , जरासे सांबार . काही मजा येत नाही. 

मनोसोक्‍त सांबार खायचे मग त्यासोबत तोंडी लावायला एकादा डोसा. ( हा "एखादा" डोसा नेहमीच ऑनियन रवा असतो. ) मग ते अश्यावेळी अमर्यदित सांबार चटणी खाण्यासाठी नरिमन पॉइंट वरच्या "स्टेटस " मधे जातात.







Monday, October 10, 2022

श्री साई स्नॅक्स

 सध्या कमळाचा जमाना येत चालला आहे. 

हल्ली वरचेवर राजाभाऊंचे "कमळ" , "कमळ " चाललेले असायचे. काकुंना कळेना केव्हापासुन हे "कमळवाले "  झाले ?

तर  हे ते कमळ.  ज्याची राजाभाऊंना आस लागली होती. 

अनेकदा आपल्या जवळच्यांकडे आपले लक्ष जात नाही. तसचं हे . जवळजवळ सात-आठ वर्षापुर्वी आपण येथे  " अंतनिवेश " खाल्ले  होते व त्याची चव अजुनही राजाभाऊंच्या लक्षात होती.  परत जाणे काही होत नव्हते.  आज मात्र मुद्दामुन ठरवुन ते गिरगाव चर्चच्या समोर असलेल्या " श्री साई स्नॅक्स " मधे सँडविच खायला गेले.

टोस्ट सँडविच तयार झाले की ते कमळाच्या पाकळ्यांसारखे उघडायचे आणि मग ते सजवायचे. 

एक मात्र गडबड झाली. राजाभाऊंना  सँडविचवर शेव घातलेली अजीबात पचनी पडत नाही.  नेमके ते शेव घालु नका हे सांगायला विसरले.










शिदोरी

 जेव्हा प्रवासात व्यवस्थीत जेवायला मिळेल की नाही हे वाटत असतांना "पाबे खिंडी" च्या वाटेवर "शिदोरी " समोर येते आणि त्या बरोबर गरमागरम जेवण.





रुचि प्रयोग

 आज मुंबईला  परततांना मुंबई-पुणे महामार्गावर (NH4) गाडी चालवतानां खुप मजा आली.

प्रत्येक प्रवासात राजाभाऊंचा पोटार्थ दडलाच असला पाहिजे का ?

"रुचि प्रयोग " मधे राजाभाऊंचे तसं बऱ्याच वेळा थांबणे होते. आज पावसाळी वातावरणात गरमागरम वडापाव.

थालिपीठावर ताव मारायला.

 राजाभाऊंना बिघडवायला दै. सकाळ पण काही अंशी कारणीभुत आहे.

सप्टेंबर ४.   दै.सकाळनी राजाभाऊंची भुक चाळवली. त्यांना घराबाहेर पडण्यास प्रवृत्त केले.

लेख तसाच भारीभक्कम. लीना शर्मा लिखीत " जरा हटके, चवदार थालिपीठ ", सोबत पुण्यात चवदार थालिपीठे कुठे मिळतात  याची भली मोठी यादी.

मग काय राजाभाऊ निघाले ज्ञानप्रबोधिनीच्या दिशेने, सुजन फूड्स मधे, थालिपीठावर ताव मारायला.

हाय रे देवा, नशिबाने डाव साधला. नेमके ज्ञानप्रबोधिनीजवळ गेल्यावर त्यांना त्या जागेचे नाव आठवेनाशे झाले,  त्यात काय मोठेसे, आपण शोधुन काढु.

मग त्यांनी ज्ञानप्रबोधिनी समोर समोशे इ. तत्सम पदार्थ विकणाऱ्याला विचारले.

"येथे कोणाकडॆ चांगली थालिपीठे मिळतात. "

"थाली क्या ? "

"थालिपीठ "

"थालि पे क्या ? "

"अरे बाबा खानेको, थालिपिठ "

"अच्छा, अच्छा, आगे दुर्वांकुर मे थाली खानेको मिलेगा. "

मग पेटलेले राजाभाऊ तेथुन निघाले ते टिळक रस्तावरच्या त्यांच्या आवडीच्या जागी, ग्राहक पेठेत, कटलेटस खायला.

दुगड भोजनशाळा, श्री.वर्धमान आगम तिर्थ, कात्रज , पुणे

 सुर्यास्तापुर्वी भोजन करावयाचे हा एक धर्मसंकेत. ही धर्माज्ञा , हा दण्डक पाळायचे राजाभाऊंनी आज ठरवले.

स्थळ  :  दुगड भोजनशाळा, श्री.वर्धमान आगम तिर्थ, कात्रज , पुणे.

वेळ - सायंकाळची. पाच वाजुन ४५ मिनिटे.

आजनी वानगी :

पंचकुटी डाल , भात, शाक - मिक्स भाजी, रोटली , खिचीया,

भोजनप्रिय राजाभाऊ कधी, केव्हा , कोठे आणि कसे पोचतील हे सांगणॆ महाकर्मकठिण. फक्‍त का पोचले हेच ते सांगु शकतील

आगम मंदिरात जेवण फार चांगले मिळते असे ते ऐकुन होते.  दुपारी घरी बसुन बसुन कंटाळा आला, मग त्यांना ही ऐकिवात असणारी गोष्ट आठवली.  त्यांचा कयास खरा ठरला, येथे छानपैकी साधे , रुचकर, चविष्ट , सात्विक भोजन त्यांना मिळाले.

मस्तपैकी लहानुसे गरमागरम तुपाने भरलेले फुलके, केळी, तोंडली वटाणा आदींची मिश्र भाजी, लाजबाब चव, खिचिया, लोणचे , आणि सोबत गुळाचा खडा, ती विशिष्ट चव असलेल्या डाळीबरोबर.

डाळ, भात आणि गुळाचा खडा. आणखी काय पाहिजे.

आता येथे परत कधीतरी सकाळी जेवायला जायला हवे.

दिवाळीच्या फराळाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.

 पुर्ण विचारांती राजाभाऊंनी एक निर्णय घेतला आहे.

निसर्गोपचार आश्रम, उरुली कांचन येथे आपले वास्तव्य काही काळासाठी तहकुब करायचे.

ह्या संबंधीत निर्णयाशी दिवाळीच्या फराळाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.

Wednesday, October 05, 2022

गरमागरम मुग डाळीची भजी

 नवरात्रात महालक्ष्मीच्या देवळात जायचे ते केवळ औपचारिकता म्हणुन. हे असे राजाभाऊंचे लहानपणापासुनचे मत. मुख्य आकर्षण मंदिर परिसरात भरलेल्या जत्रेचे.

देवीचे दर्शन घ्यायचे , देवळाच्या मागे खडकांवर जाणे, तेथल्या हॉटेलमधे गरमागरम मुग डाळीची भजी, चिंचेच्या गोड गोड चटणीत बुडव बुडब बुडवुन खाणे, परततांना जत्रेतील स्टॉलमधे पिपाणी, तलवार, ढोलकी घेणे, लहानसहान इतर खेळणी घेवुन घरी परतणे.

आज राजाभाऊ त्याच ओढीने जत्रेला गेले, फोटो काढायचे म्हणुन.

जत्रेतील स्टॉलची जागा गायब. अफाट गर्दी, भाविकांसाठी मंडपामुळे जत्रा आकसलेली. मन खट्टु झाले.

मग तुका म्हणे त्यातल्यातात. काही नाही तर चिंचाबोरे तरी खाऊ.




श्रीपतशेठ च्या हॉटेलामधला

 बटाटा वडा. फारच टेस्टी. 

श्रीपतशेठ च्या हॉटेलामधला.

रोज नवी चव. रोज नवा रंग.

ज्या दिवशी कंपनीत ज्या तेलाचे टॅंकर खाली होतील त्या दिवशी त्या तेलात तळलेला.

Castor oil, Rice Bran Oil, Crude Palm Stearin, Palm Fatty Acid Distillate, Mowrah Oil, Crude Palm Fatty Acid Distillate etc etc

चायनीज मसाला डोसा

 सिंगापुरी बटाटा वड्‍यानंतर आता चायनीज मसाला डोसा 

मांसाहरींना चिली चिकन , शाकाहारींना चिली साधा डोसा



सुखसागर

 " मी आता रात्री घरी जेवण करणार नाही. सणाला पण मी किचनमधे अख्खा दिवस राहु काय ? "

हुकुम.

काळेकाका पोचले "सुखसागर" मधे. 

पावभाजी बेस्ट इन द वर्ल्ड.






दुर्गा पुजा. शिवाजी पार्क

 दुर्गा पुजा. शिवाजी पार्क. यंदाला जाणे अंमळ लवकरच झाले. सकाळी मुर्तीवर अखेरचा हात फिरवणे चालले होते. मग काय राजाभाऊंचा फेरफटका मिनी कोलकोतामधे.





माणिकलाल सॅनेटोरीयम

 लोणावळ्यामधल्या फासेबाईंच्या खानावळीनी परत एकदा राजाभाऊंना हुलकावणी दिली.

फेसबुकवर फासेबाईंच्या खानावळीबद्दल वाचल्या नंतर राजाभाऊंच्या पोटाने जी वळवळ सुरु केली आहे ती अजुनपर्यंत थांबण्याचे नाव नाही.

एक तर राजाभाऊंची स्वारी संध्याकाळी तरी पुण्याला जाण्यासाठी निघते किंवा भल्या सकाळी सकाळी. 

शुक्रवारी मात्र राजाभाऊंनी पक्का निश्चय केला होता, आज काही झाले तरी फासेबाईंकडे जेवायला जायचे म्हणजे जायचेच. त्यात परत त्यांच्याकडे मिळणाऱ्या मांसाहारी जेवणाची वर्णने आपल्या मांसाहारी पिताश्रींना सांगुन त्यांच्या अपेक्षा भलत्याच वाढवुन ठेवलेल्या. दुपारी जेवणाच्यावेळीस लोणावळ्याला पोचु या बेताने ते निघाले. घाटात आणि लोणावळा पर्यटकांनी ओसांडुन वाहिलेला. आणि बेशिस्तीने केलेला तुफान ट्रॅफिक जॅम. तरी पण नेटाने वाट काढत काढत  लोणावळ्यापर्यंत पोचले.  

"लोणावळ्याच्या बाजारात पोचलो की " हे वाचलेले. कसेबसे वाट काढत ते लोणावळास्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या बाजारात पोचले. मग तेथे गेल्यानंतर त्यांना कळले, तो बाजार हा नव्हे. 

परतीचे दोर तर गर्दीने कापलेले. मग मराठीपेक्षा गुजराती केव्हाही बरे हा न्यायाने ते भांगरवाडीमार्गे नांगरगावमधल्या आपल्या आवडीच्या एका जागी "जमवा मां " पोचले . 

"माणिकलाल सॅनेटोरीयम." 

खुप चविष्ट गुजराती जेवण येथे मिळते. शाक मधे कोबीची भाजी, चण्याची भाजी आणि दम आलु ( हल्ली पंजाबी पदार्थ गुजरातेत कुठुन शिरतात देव जाणॆ. गरमागरम फुलके, डाळभात आणि वरती राजाभाऊंना परमप्रिय असणारी कटलेटस, छानश्या तिखट चटणी, चिंचेच्या चटणी सोबत.

आज पुन्हा गुजराती थाळी. "सम्राट" मधे

 अकबराच्या दरबारी एक माणुस आला. असंख्य भाषा अगदी सहजगत्या बोलणारा. अकबराला त्याने आव्हान दिले. " माझी मातृभाषा कोणती ते ओळखुन दाखवा. " दरबारातील अनेक पंडितांनी त्याची अनेक भाषेमधे परीक्षा घेतली. पण त्यांना नाही ओळखता आले. सर्वच भाषा तो तितक्याच लिलयेने बोलत असे. शेवटी आपले बिरबल मदतीला होतेच.  रात्री त्या गृहस्थाला त्यांनी भरपेट भोजन (हे महत्वाचे)  खिलवले, चांगले गोडधोड. तो गृहस्थ सुस्तवला, आळसावला. झोप अनावर झाली, गाढ झोपी गेला. पहाटे साखरझोपेत असतांना बिरबलाने त्याच्या तोंडावर थंडगार पाणी ओतले.

"સુ થયુ, સુ થયુ, ?. " 

 तो एकदम दचकुन जागा झाला. बिरबल म्हणाला तुझी मातृभाषा ગુજરાતી.

आज सकाळी काहीसे असेच झाले. राजेशभाईंचा जरा अंमळ डोळा लागला होता.  काकु त्यांना आज नास्त्याला काय करु विचारायला गेली आणि अचानक ते दचकुन जागे झाले, आणि ओरडु लागले. 

" જમવા ચાલો જી, જમવા ચાલો. "

पण ही आजचीच गोष्ट नाही. . राजेशभाईंचे गुजराती खाण्याचे, भोजनाचे वेड दिवसेंदिवस वाढु लागले आहे. राजेशभाईंवर कोणी काय जादु केली आहे हे जाणे. 

मग काय आज पुन्हा गुजराती थाळी. "सम्राट" मधे.  गेल्याच आठवड्‍यामधे राजेशभाई "ठक्कर्स" मधे गुजराती भोजन जेवायला गेले होते. पण एक मात्र बरयं ते जेथे जातात तेथे ते काकुंना घेवुन जातात. एकटे कधीच जात नाहीत.

  " आता बदल हवा " असं काळेकाकांना नक्की केव्हापासुन वाटायला लागणार आहे हे श्रीनाथजीच जाणे.

दयाराम दामोदरची सुतारफेणी

 दयाराम दामोदरची सुतारफेणी आणि खोबरा पॅटीस. 

राजाभाऊंवर मृत्यलेख लिहितांना नक्कीच कोणीतरी लिहिणार " हे खाऊन खाऊन मेले ?




विनय

 आज काळबादेवीच्या दर्शनाला चालत जातांना ( हे अनवाणी घरुन चालत जाणॆ नव्हे, तर रेल्वेस्थानकावरुन ) राजाभाऊंना अचानक जाणवलं , आपण सतत त्याच त्याच उपहारगृहात खायला जात आहोत आणि तेथे तेच तेच पदार्थ खात आहोत. 

मग त्यांनी निश्चय केला आज कुठल्यातरी नव्या जागी जायचे.  

या निश्चयाला पहिल्याच घासाला मोडता घातला तो काळेकाकुंनी. त्यांना साबुदाणा वडा खाण्यासाठी "विनय" मधे जावेसे वाटत होते. साबुदाणा वडा पेक्षा त्यासोबत मिळणारा "तो" पदार्थ त्यांना जास्त आवडत असतो.

मग काहीतरी राजाभाऊंना तिखट, चटकदार, झणझणीत खावेसे वाटले, मग आपली नेहमीचीच उसळ आणि तेच पाव. ह्या उसळला दुसरा पर्यायच नाही  

एक गोड दही मिसळ आणि त्यानंतर चविष्ट बटाटावडा. 

या ठिकाणाचा बटाटावडा हा काहीसा वेगळाच असतो  

मुंबईमधे मराठीमोळी खाद्यपदार्थांसाठी "विनय" उत्तम, सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ट आहे.








Friday, September 30, 2022

सुजाता

 सुजाता . 

बायका आपल्या नवऱ्यावर बारीक लक्ष ठेवायला आजकल फेसबुकवर आपलं खातं खोलतात असा राजाभाऊंना दाट संशय आहे.  हेरगिरी निव्वळ हेरगिरी.

आपला नवरा आज कुठे  हादाडायला गेला होता हेच , केवळ हेच जाणुन घेण्यासाठी तर काळेकाकूंनी हा सारा खटाटोप तर मांडला नसावा ? 

आज येथे जेवतांना राजाभाऊंना नक्की खात्री होती , आपली बायको आपल्यावर नक्कीच ओरडणार. पण त्यांना खात्री होती की हे ओरडणे काहीसे वेगळे असेल. 

का जेवायला बाहेर गेला च्या ऐवजी एकटा का येथे जेवायला गेलास   ?

आजकालच्या जमान्यात मुंबईमधे मराठमोळं भोजन मिळेल अशी उपहारगृह राहिली आहेत तरी कुठे ? हातांच्या की हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी. ठाकुरद्वारचे "सुजाता उपहार गृह " (पुर्वश्रमीचे बी. तांबे ) मात्र आपला चेहरामोहरा अजुनही शाबुत ठेवुन आहे.

"आलोच " म्हणुन राजाभाऊ जे गायब झाले ते पोचले थेट "सुजाता" मधे. दोन वाट्या घट्ट गोड दही, दोन वाट्या चवदार , रुचकर आमटी आणि बटाटा सुकी भाजी खायला.  हा सारा पसारा मांडला गेला होता ते केवळ "डाळींबी" साठी.

ताट.  

ताटात दोन भाज्या आपल्या आवडीप्रमाणे. जवळजवळ ७-८ भाज्यांमधुन निवडायच्या.  मग त्यासोबत आमटीभात,  दही आणि समाधान.

हे समाधान शेवटी सत्य.