राजाभाऊंना त्यांच्या डोळ्यानी दगा दिला होता, पण नाकाने बरोबर मार्ग दाखवला.
राजाभाऊंना त्यांच्या डोळ्यानी दगा दिला पण त्यांच्या तोंडाने बरोबर चव जाणली.
समोरचा माणुस दिसत नाही पण नाक मात्र सांगते आहे इथेच कुठेतरी.
डोळ्यासमोर मक्याचे कणीस भाजले जातेयं पण चव लागते जणु उकडलेल्या कणसासारखी.
एक गृहस्थ रॉक्सी चित्रपटगृहासमोरील पदपथावर आपली चुल घेवुन बसायचे. ते अचानक तेथुन गायब झाले. काही दिवसांनी ते राजाभाऊंना रॉक्सी बाहेर सापडले. मग तेथुन ते परत दिसेनासे झाले होते. मग राजाभाऊंनी ते आपला बोऱ्याबिस्तरा घेवुन गावाला गेले असतील अशी मनाची समजुत करुन घेतली. आणि त्यांचा नाद सोडला.
परवाला रस्तावरुन जातांना गाडी चालवता चालवता अचानक भाजल्या जाणाऱ्या कणसाचा सुवास त्यांच्या नाकी पडला आणि मग काय.
युरेका , युरेका.
अमेरीकन कॉन. आधी सालासकट चुलीमधे आतल्या भागात खुप वेळ भाजले जाते, मग सालासकट निखाऱ्यावर. सालं काढुन पुन्हा निखाऱ्यावर व्यवस्थित भाजले गेले की मग सुरीने सोलुन त्याचे दाणे काढायचे.
दाण्यांवर दोनपाच प्रकारचे चटकमटक मसाले, लिंबु आणि मस्का मारके झाले की समोर पेश केले जाते त्याची लज्जत लुटायला.
आता ह्यांनी बाजुच्या पदपाथावर आपली चुल मांडली आहे. वयस्कर गृहस्थांची जागा त्यांच्या मुलाने घेतली आहे.
No comments:
Post a Comment