केळकरकडुन जरा वर सरकले की बाजुलाच एक गुजराथी भोजनालय होते, येथे जाण्याचा कधी योग आला नाही. कदाचित एकदा जेवलोही असेन. पण नाही आठवत.
दोन हत्ती च्या गल्लीतील "सहकार" . हे राजाभाऊंच्या आवडीचे होते, शाळेतुन घरी जातांना येथे भेट देणे हमखास ठरलेले असायचे. ह्यांची जागाही खुप मोठी होती. येथे राजाभाऊ नेहमी कटलेट्स खायचे.
एकदा असेच कटलेट खाल्यानंतर पैसे देतांना कळले की पाच पैसे कमी पडताहेत. मग काय , कंपास पेटी गहाण ठेवली गेली.
इंपिरीयलच्या बरोबर समोर एक उडप्याचे हॉटेल होते " कृष्णा " , त्याच्या वरती मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय. वरती पुस्तक जावुन बदलायचे आणि खाली येवुन कधी शिरापोहा मिक्स, कधी उपमापोहा मिक्स, तर कधी इडली नाहीतर डोसा.
शेरे-पंजाब (१) , शेरे-पंजाब (२).
स्वतिकच्या समोर "आराम " नावाचे गुजराती थाळी जेवण्यासाठी एक चांगले भोजनगृह होते.
वसंत विलास. राजाभाऊंच्या घराजवळचे, उडप्याचे. कांदा भज्यात झुरळ मिळाले तरी जाणे काही बंद केले नव्हते.
No comments:
Post a Comment