"नेवेदय ". स्वामी विवेकानंद रस्ता, गोरेगाव.
आपले मराठीमोळं जेवण किती छान आणि देखणं असु शकते हे "नेवेद्य " नी दाखवुन दिले होते.
तांदळ्याची भाकऱ्या, भरली वांगी, पिठले , उकडीचे मोदक, डाळींब्या आणि असे असंख्य आपले पदार्थ खावे तर इथलेच असे म्हटले तर फारसं वावगं ठरु नये. खाण्याच्या बाबतीत काहीश्या कटकटीपणा असलेल्या राजाभाऊंना या जागेची ओळख त्यांच्या मेहुणींनी करुन दिली आणि ते "नेवेद्य" च्या प्रेमात पडले होते आणि कधी नाही ते बायकोच्या माहेरी मग ते मोठ्या हौसेने जायला लागले. घरी परततांना येथे जेवणे हे नित्यनेमाचे झाले होते.
अकस्मात ते बंद झाले. बंद झालेले दिसले तेव्हा खुप वाईट वाटले होते.
No comments:
Post a Comment