कुठे चांगलेसुरखे खायला मिळते या बद्दल अनेक जण लिहीत असतात. पण ज्यांनी एके काळी जेवु घातले ,खावु घातले होते, खवय्यांची हौस भागवली होती त्यांची आठवण न काढणे . ठेवणे हे काहे बरे नव्हे केवळ ही भावना.
कालपासुन ह्या बंद झालेल्या उपहारगृहांची आठवण काढु लागलो. अचानक ऐन रात्रीपासुन एका उपहार/भोजनगृहाने सतवायला सुरवात केली. खरं म्हणजे ह्याची आठवण सर्वप्रथम यायला हवी होती. ह्याला विसरुन चालणार कसे ?
"गीता भवन " , नवजीवन सोसायटी, मुंबई सेंट्रल .
चवदार, रुचकर सिंधी पंजाबी जेवण मिळण्याचे एक ठिकाण. अत्यंत साधे, स्वयपाकघर खुप स्वच्छ होते अरे नाही, पण जेवण मात्र लाजबाब. आणि बऱ्यापैकी स्वस्त. केव्हाही बघाव गर्दी असायचीय.
येथे मिळणारी डाळ फ्राय, त्यावर फोडणी दिलेल्या पसरलेल्या तेलाचा तवंग, पुलाव , रगडा पॅटीस, गाजर हलवा, भाज्यांचे चव अजुनही आठवणीत आहे.
No comments:
Post a Comment