Wednesday, October 05, 2022

आज पुन्हा गुजराती थाळी. "सम्राट" मधे

 अकबराच्या दरबारी एक माणुस आला. असंख्य भाषा अगदी सहजगत्या बोलणारा. अकबराला त्याने आव्हान दिले. " माझी मातृभाषा कोणती ते ओळखुन दाखवा. " दरबारातील अनेक पंडितांनी त्याची अनेक भाषेमधे परीक्षा घेतली. पण त्यांना नाही ओळखता आले. सर्वच भाषा तो तितक्याच लिलयेने बोलत असे. शेवटी आपले बिरबल मदतीला होतेच.  रात्री त्या गृहस्थाला त्यांनी भरपेट भोजन (हे महत्वाचे)  खिलवले, चांगले गोडधोड. तो गृहस्थ सुस्तवला, आळसावला. झोप अनावर झाली, गाढ झोपी गेला. पहाटे साखरझोपेत असतांना बिरबलाने त्याच्या तोंडावर थंडगार पाणी ओतले.

"સુ થયુ, સુ થયુ, ?. " 

 तो एकदम दचकुन जागा झाला. बिरबल म्हणाला तुझी मातृभाषा ગુજરાતી.

आज सकाळी काहीसे असेच झाले. राजेशभाईंचा जरा अंमळ डोळा लागला होता.  काकु त्यांना आज नास्त्याला काय करु विचारायला गेली आणि अचानक ते दचकुन जागे झाले, आणि ओरडु लागले. 

" જમવા ચાલો જી, જમવા ચાલો. "

पण ही आजचीच गोष्ट नाही. . राजेशभाईंचे गुजराती खाण्याचे, भोजनाचे वेड दिवसेंदिवस वाढु लागले आहे. राजेशभाईंवर कोणी काय जादु केली आहे हे जाणे. 

मग काय आज पुन्हा गुजराती थाळी. "सम्राट" मधे.  गेल्याच आठवड्‍यामधे राजेशभाई "ठक्कर्स" मधे गुजराती भोजन जेवायला गेले होते. पण एक मात्र बरयं ते जेथे जातात तेथे ते काकुंना घेवुन जातात. एकटे कधीच जात नाहीत.

  " आता बदल हवा " असं काळेकाकांना नक्की केव्हापासुन वाटायला लागणार आहे हे श्रीनाथजीच जाणे.

No comments: