व्हिवा पश्चिम.. वरळी नाका.
खाद्यक्षेत्रातील फार मोट्या व्यक्तींनी हे रेस्टॉरंट सुरु केले होते. गोवा , पश्चिम किनारपट्टी पासुन मग महाराष्ट्रातील अनेक प्रांतातले भोजन येथे मिळत असे. सीकेपी आदी मुळाच्या रहिवाश्यांची खाशीयत असलेले पदार्थ पण मिळत असत. नावाचा खुप दबदबा होता. ह्या बद्द्ल खुप चांगले लिहिलेले, तारीफ केलेले वाचायला मिळायचे.
असेच भुलुन राजाभाऊ एकदा सकुटुंब सपरिवार येथे आपल्या पद्धतीचे अन्नग्रहण करण्यास गेले.
अत्यंत महागडे आहे हे ठावुक असतांना गेल्यानंतर वास्तविक पहाता बील देतांना मन खट्टु व्हायला नको होते. पण झाले खरे.
आपली बायकोनी बनवलेल्या बटाट्याच्या, वांग्याच्या भाजीची चव ह्यांच्या चवीपेक्षा चांगली असते, हा पदार्थ असा असतो ? आपले एक महिन्याचे रेशन या पैश्यात आले असते अश्या विचारांना खरं बघायला गेलं तर नंतर काहीच अर्थ नसतो.
पण निराशा झाली खरी. वाटली तशी जागा मोठी नव्हती, लहानशीच जागा, येथे म्हणे खुप चांगले कार्यक्रम होतात असे वाचले होते. कदाचित त्या दिवशी नसावेत.
नंतर कधीतरी..
परत एकदा येथे जाणॆ झाले आजोबा आणि नातु. फक्त दोघेच. आजोबांकडुन नातवाला ट्रीट.
आपला मुलगा त्याच्या मुलाला जेवायला घेवुन ह्या ठिकाणी गेला होता म्हणुन आपण आपल्या नातवालाही तेथे आपण घेवुन गेलो ही माझी चुक झाली असे प्रांजळपणे राजाभाऊंच्या वडलांनी कबुल केले.
केव्हाच बंद झाले.
No comments:
Post a Comment