Monday, October 31, 2022

भारत ज्योती, कामत

 एवढ्या मोठ्या महानगरात, एका अश्या शहरात जे चोवीस तास बाहेर रस्तावरच असते , एवढ्या मोठ्या संख्येने उपहारगृह/ भोजनगृह अशी कशी बंद पडतात हे समजण्यासाठी जरा मुश्किल होवुन जाते.

नानाचौकातुन ग्रॅंटरोड रेल्वेस्थानकाकडे जातांना उजव्या बाजुला "भारत ज्योती " मधे उसळपाव, पोळाउसळ खाल्लाचे आठवते. छोटीशीच जागा होती. 

डाव्या बाजुला एक आइसक्रीम पार्लर होते. बऱ्यापैकी मोठी जागा,  वाईन पिण्यासाठी असलेल्या मोठ्या गोल ग्लासाप्रमाणे असलेल्या ग्लासात आइसक्रीम, जेली मिळायची. अनेक प्रकारची सरबतं सुद्धा असायची, ग्लासांची, सरबतांच्या बाटल्यांच्या शोकेस मधे केलेली मांडणी अजुन आठवते.

जरा पुढे गेले की भाटीया रुग्णालयाच्या समोर "कामत" होते. किती वर्षे बंद पडल्याला झाली असतील , पण नावाचा बोर्ड अजुन जागच्या जागी आहे.

No comments: