घराबाहेरच्या कोणी त्यांच्या मनात काय आहे हे सांगितले तर आपल्याला तसा फरक पडत नाही.
पण जेव्हा घरातील प्रधानसेवक राजेशभाईंना सकाळी सकाळी "मी मन ची बात सांगु का " असे म्हणतात तेव्हा मात्र नाही म्हटलं तरी मनात धडकी बसल्यावाचुन रहात नाही.
पण जेव्हा अपेक्षा सांगितल्या जातात तेव्हा जीव कसा ताटात पडतो. इच्छा अगदी माफक असते. पुर्वश्रमीचे "बी.तांबे" आणि आताचे " सुजाता उपहारगृहामधे " जेवायला जायचे असते.
"एक भाकरी, बटाटा सुकी भाजी, डाळींबी, टॉमेटो बटाटा रस्सा भाजी आणि वर डाळभात, सोबत दो वाट्या दही." चक्क ऐश.
मन तृप्त आणि खिसाही. परत साधे मराठंमोळ जेवण, पोटाला बाधणे नाही. आहारनियंत्रण ही सोडणे नाही.
No comments:
Post a Comment