Wednesday, October 05, 2022

माणिकलाल सॅनेटोरीयम

 लोणावळ्यामधल्या फासेबाईंच्या खानावळीनी परत एकदा राजाभाऊंना हुलकावणी दिली.

फेसबुकवर फासेबाईंच्या खानावळीबद्दल वाचल्या नंतर राजाभाऊंच्या पोटाने जी वळवळ सुरु केली आहे ती अजुनपर्यंत थांबण्याचे नाव नाही.

एक तर राजाभाऊंची स्वारी संध्याकाळी तरी पुण्याला जाण्यासाठी निघते किंवा भल्या सकाळी सकाळी. 

शुक्रवारी मात्र राजाभाऊंनी पक्का निश्चय केला होता, आज काही झाले तरी फासेबाईंकडे जेवायला जायचे म्हणजे जायचेच. त्यात परत त्यांच्याकडे मिळणाऱ्या मांसाहारी जेवणाची वर्णने आपल्या मांसाहारी पिताश्रींना सांगुन त्यांच्या अपेक्षा भलत्याच वाढवुन ठेवलेल्या. दुपारी जेवणाच्यावेळीस लोणावळ्याला पोचु या बेताने ते निघाले. घाटात आणि लोणावळा पर्यटकांनी ओसांडुन वाहिलेला. आणि बेशिस्तीने केलेला तुफान ट्रॅफिक जॅम. तरी पण नेटाने वाट काढत काढत  लोणावळ्यापर्यंत पोचले.  

"लोणावळ्याच्या बाजारात पोचलो की " हे वाचलेले. कसेबसे वाट काढत ते लोणावळास्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या बाजारात पोचले. मग तेथे गेल्यानंतर त्यांना कळले, तो बाजार हा नव्हे. 

परतीचे दोर तर गर्दीने कापलेले. मग मराठीपेक्षा गुजराती केव्हाही बरे हा न्यायाने ते भांगरवाडीमार्गे नांगरगावमधल्या आपल्या आवडीच्या एका जागी "जमवा मां " पोचले . 

"माणिकलाल सॅनेटोरीयम." 

खुप चविष्ट गुजराती जेवण येथे मिळते. शाक मधे कोबीची भाजी, चण्याची भाजी आणि दम आलु ( हल्ली पंजाबी पदार्थ गुजरातेत कुठुन शिरतात देव जाणॆ. गरमागरम फुलके, डाळभात आणि वरती राजाभाऊंना परमप्रिय असणारी कटलेटस, छानश्या तिखट चटणी, चिंचेच्या चटणी सोबत.

No comments: