मेला.
पुनम चेंबर्स कडुन वरळीनाक्याला जो रस्ता वळतो तेथेच कोपऱ्यावर हे "मेला " होते.
अगदी नावाला साजेशे.
एक धम्माल जागा. नुसतेच जेवण जेवायचे नाही तर जत्रेची मजा लुटत त्याचा आस्वाद घ्यायची.
ही थीम असलेले मुंबईमधले बहुदा हे पहिलेच रेस्टॉरंट.
ज्योतिष्यी, पोपटवाले, मेंदी काढणाऱ्या, समोर बांगड्या बनवुन हातात घालायला देणाऱ्या, जत्रेमधे जसे वातावरण असते अगदी तसेच. जेवणही टेस्टी असायचे
का कोण जाणे पण बंद पडले. नंतर त्यांनी या जागेचा, ह्याच माहोलमधे पार्ट्या देण्यासाठी उपयोग करायका सुरु केले. तेव्हाही राजाभाऊ तेथे ऑफीस मधुन गेले होते.
मग ते ही बंद झाले.
No comments:
Post a Comment