एकदा का एखाद्या माणसाचे कानफाट्या नाव पडले की मग त्यानी कितीही जीव तोडुन खरं सांगितले तर कोणाचाही त्याच्यावर काडीमात्रही विश्वास बसत नाही.
राजाभाऊ खरच आज सकाळ आयोजीत फुड फेस्ट मधे जेवले नाहीत.
आजचा हा ह्या महोत्सवाचा पहिला दिवस. राजाभाऊ अंमळ जरा लवकरच येथे गेले. कैसे धरु धीर. अनेक स्टॉलवर अजुनपर्यंत जेवणाची व्यवस्था होत होती. आपल्या पुण्याच्या हिंदुस्थान बेकरीच्या स्टॉलवर जावुन व्हे. पॅटीस खावासा वाटला, पण माल काही तेथे पोचला नव्हता.
आज जरा राजाभाऊंनी येथे पहाणी केली, कुठे काय काय मिळते ह्याची. मांसाहारी आणि त्यामधेही मत्सप्रिय माणसांची येथे चंगळ आहे. वरसोव्याच्या कोलीनबायंनी लावलेले बरेच स्टॉल येथे आहेत.
ता.क. - मासवडी आणि शेंगोळ्या हे पदार्थ खाणे म्हणजे जेवण नव्हे. दोन्ही पदार्थ मस्त होते
No comments:
Post a Comment