सध्या कमळाचा जमाना येत चालला आहे.
हल्ली वरचेवर राजाभाऊंचे "कमळ" , "कमळ " चाललेले असायचे. काकुंना कळेना केव्हापासुन हे "कमळवाले " झाले ?
तर हे ते कमळ. ज्याची राजाभाऊंना आस लागली होती.
अनेकदा आपल्या जवळच्यांकडे आपले लक्ष जात नाही. तसचं हे . जवळजवळ सात-आठ वर्षापुर्वी आपण येथे " अंतनिवेश " खाल्ले होते व त्याची चव अजुनही राजाभाऊंच्या लक्षात होती. परत जाणे काही होत नव्हते. आज मात्र मुद्दामुन ठरवुन ते गिरगाव चर्चच्या समोर असलेल्या " श्री साई स्नॅक्स " मधे सँडविच खायला गेले.
टोस्ट सँडविच तयार झाले की ते कमळाच्या पाकळ्यांसारखे उघडायचे आणि मग ते सजवायचे.
एक मात्र गडबड झाली. राजाभाऊंना सँडविचवर शेव घातलेली अजीबात पचनी पडत नाही. नेमके ते शेव घालु नका हे सांगायला विसरले.
No comments:
Post a Comment