Monday, October 17, 2022

तिवारी मिठाईवाला

 कधीकधी एकाद‍या दुकानात आपल्या आधी उभे असणारे वैताग कंटाळा आणतात, आपल्या सहनशक्‍तीची परिक्षा बघतात.

तिवारी मिठाईवाला. दसऱ्याचा शुभदिन. अफाट गर्दी. राजाभाऊ समोसे आणायला गेलेले. रांगाचरांगा. 

कॅशियर पुढे रांग, मिठाई देणाऱ्यांपुढे, बांधणाऱ्यांपुढे रांग. 

पहिली रांग कॅशियर पुढची. आता चौकश्या करायच्याच झाल्यातर येथे केल्या जावु नयेत, माल, किंमत ही काउंटरवर जावुन पहावे.  पण नाही, चौकश्या काही संपत नाहीत , काय हवं ते काही सांगितलं जात नाही. शेवटी घेतले काय तर दोनशे ग्रॅम पेठे.

दुसरी रांग खाद्‍यपदार्थ घेण्यासाठी. तेहतीस समोसे हवेत, एका पिशवीत आठ, दुसऱ्या पिशवीत पाच, तिसऱ्या  पिशवीत तीन, वेगळ्या पिशवीत बारा. दोन इथे खायला, दोन प्लेट मधे , प्रत्येक पिशवीमधे वेगवेगळ्या चटण्या टाका. आधीच अफाट गर्दी. त्यात ह्या असल्या मागण्या. वर पिशवीवर लिहा आत किती समोसे आहेत ते.  कंट्रोल राजाभाऊ कंट्रोल. भुक आणि राग दोन्ही आवरा. 

परत वर ह्याच सुचना नवरा आणि बायको दोघेही एकाच वेळी देत होते. बांधणाऱ्यांचा गोंधळ, प्रचंड गोंधळ. पिशव्या उघडा , आत पहा किती समोसे आहेत ते. 

राजाभाऊ, कंट्रोल.

No comments: