Sunday, October 23, 2022

समरकंद, पाम्स आणि सपर्स कल्ब - बंद पडलेली उपहारगृह

 जी ए म्हणतात तेच खरं. फक्‍त आठवणी आणि भुतांना उलटे पाय असतात.

बंद पडलेल्या, झालेल्या उपहारगृहांची, भोजनगृहांबद्दल विचार करायला राजाभाऊ लागले असता त्यांच्या डोळ्यासमोरुन अनेक नावं सर सर जात चालली. 

ही ठिकाण रस्तावर असो किवां पंचताराकिंत हॉटेलामधली. बंद झाली खरी

मुंबई सारख्या महानगरात जेथे लक्षावधी माणसं  घराबाहेर जेवत असतात तेथे हे असे बंद होणे काहीसे पटत नाही.

"समरकंद, पाम्स आणि सपर्स कल्ब " तिन्ही जागा ओबेरॉय मधल्या. 

राजाभाऊंचा साखरपुडा झाल्यानंतर पहिल्यावेळी ते खास माणसाबरोबर फिरायला बाहेर गेले तेव्हा निवांत बसुन गप्पा मारण्यासाठी त्यांनी "समरकंद " निवडले. तळमजल्यावरचे कॉफी शॉप, समोर समुद्र. तेथे त्यांना फक्त कोल्ड कॉफी परवडण्यासारखी होती. दोन कॉफी, दोन तास, दोघांच्या मस्त रंगलेल्या गप्पा.

मग समरकंद गेले त्याची जागा "पाम्स" नी घेतली. बुफेचा जबरदस्त मोठा स्प्रेड. कधी स्वः खर्चाने तर बऱ्याच वेळा कार्यालयामधुन ते येथे अनेक वेळा जेवायला गेले . ते ही बंद झाले.

सर्वात वरच्या मजल्यावर "सपर्स कल्ब " होते. त्याचे छ्त खुप सुंदर होते. मध्यभागी मोर आणि संपुर्ण छतभर पसरलेला त्याच्या पिसारा. आपल्या दोस्ताबरोबर राजाभाऊ गेले होते. मित्राला दारु पिण्याची हुक्की आली. तरी ते सांगत होते, दारु प्यायची असल्यास बाजुच्या बार मधे जा, मग काय जेवणाची ऑर्डर करतांना हळुच अधुन मधुन खिश्याची चाहुल घ्यायला लागत होती. 

हे सुद्धा बंद झाले

No comments: