"रामानजनेया "
अप्सराच्या बाजुला अलीभाई प्रेमजी, त्याच्या बाजुला रामानजनेया. माटुग्याच्या कुठल्याही उपहारगृहाच्या तोडीस तोड असलेली उडपी खाद्यगृह.
बंद पडले. मग सुनील शेट्टीनी ही जागा घेवुन तेथे एक छान पैकी , सिंगापुर, मलेशिया आदी देशांमधले जेवण देणारे रेस्टॉरंट काढले. जेमतेम काही दिवसच सुरु राहिले होते.
वास्तविक पहाता "रामानजनेया " बरोबर सुनील शेट्टीची भावनिक जवळीक होती. त्याचे वडील येथे कामाला होते. पण नाही जमले , कदाचित काळाच्या आधीच, फार लौकर त्यानी अश्या पद्धतीचे रेस्टॉरंट काढल्यामुळे सुद्धा असेल.
डॉं. भडकमकर मार्गावरील बंद पडलेल्या " वसंत विलास " वाल्यांचेच एक उडपी खाद्यगृह ग्रॉंटरोड रेल्वेस्थानकासमोर मेरवानच्या जरा पुढे होते. ते ही बंद झाले.
इम्पिरीयलच्या बाजुला "कामत " होते ते बंद पडले पण त्याची जागा "वसंत भुवन " ने घेतली आहे. जेमतेम सुरु राहिले आहे.
No comments:
Post a Comment