Sunday, June 12, 2011

परमेश्वराची कृपा की चमत्कार

ही अशी माणसे द्रुतगती महामार्गावर अपघातात न सापडुन जिवंत रहातात, सुखरुपपणे इच्छीत स्थळी पोहोचतात हा एक चमत्कारच  म्हणायचे.


पावसाळ्याचे दिवस. खंडाळा घाट. डावीकडॆ रस्तावर आलेले दगडधोंडे आणि लाल माती.

कांचन - यवत जवळ

कांचन.

काय राजाभाऊ अगदी मणी"कांचन"योग जुळुन आला म्हणायचा.

छानसे खाद्यगृह. शाकाहारी. मस्त पावसाळी माहोल, रम्य संध्याकाळ,  सुंदर अंतर्गत सजावट, अतिथ्यशील कर्मचारीवर्ग व स्वःत मालक. चविष्ट जेवण. सजवुन समोर आणलेले अन्न. 

आतापर्यंत हे नजरेतुन सुटलेच कसे याचा राहुन राहुन विचार. किती वेळा आपण पुणॆ-सोलापुर हमरस्तावर प्रवास केलेला. अगदी भुकेल्या पोटी वहान हाकलेले, हायवेवर कुठे काय चांगले जेवायला मिळणारच नाही हा विचार करत. 

भुलेश्वर वरुन परततांना स्नेहींनी हायवेवर एखाद्या धाब्यावर जेवु करत केलेली फर्माईश. राजाभाऊ त्या कल्पनेत फारसे उत्साही नसलेले. जेव्हा का त्यांनी "कांचन" मधे पाऊल ठेवले तेव्हा त्यांचा पुर्वग्रह मावळलेला. 






यवत पासुन पुण्याला येतांना हे "कांचन " लागते. अगदी सायंकाळी मुद्दामुन पुण्याहुन येथे जेवायला जाण्यासाठी उत्तम ठिकाण. दुपारी मिळणारी महाराष्ट्रीय भोजनाची थाळी . सायंकाळ पर्यंत मिळणारे खाद्यपदार्थ. रात्री पंजाबी व चायनीज जेवण. 

राजाभाऊ आणि त्यांच्या बायकोचे एकमत झाले. आयुष्यातील फार दुर्मिळ घटना. नाहीतर नवऱ्याला एखादी गोष्ट पसंद आली की त्याला नाक मुरडायचा हा यांच्या स्वभाव. 

परत एखाद्या रात्री येथे जेवायला यायचेच यायचे, मुलाला घेवुन. 

Wednesday, June 08, 2011

अशी रात्र




रात्रीचे साडॆसात- पावणेआठ वाजले असावेत, प्रकाशाचा रंगांचा खेळ अजुन चाललेला.

एक नवे कारण

मुलाला चांगली नोकरी नाही.
मुलगा व्यसनी आहे,
मुलगा दिसायला चांगला नाही,
मुलगा अगदीच बावळट आहे.
मुलाची आई खाष्ट आहे
मुलाचे स्वःतचे घर नाही.
मुलावर पाठच्या बहिणींची जबाबदारी आहे.

आणि आता

काय पाव्हन

मोर बघायला जनु आलासा



काय पाव्हन

मोर बघायला जनु आलासा



मोराची चिंचोली

घन गरजत बरसत आले की वनी मोराचा षडज लागतो, पिसारा फुलवुन आनंदाने नाचु लागतो , हे सारे वाचलेले. ते अनुभवण्यासाठी गाठली ती थेट मोराची चिंचोली. 

संध्याकाळचे ५.३०-६.०० चा सुमार. 
रस्तातुन जातांना जे आजुबाजुला मोर , लांडोरी पाहिल्या त्याला सुमार नाही. 
मजा आली. वातावरण फार आल्हाददायक असल्याकारणे भटकणेही चांगले झाले.








Tuesday, June 07, 2011

निसर्ग आणि दानव

ज्या प्रमाणे पावसाची प्रतिक्षा चातक करत असतो त्याच प्रमाणे बेवडे कंपनी पण करत असते.
पावसाळा सुरु होतोनहोतो तोच दारुड्यांच्या झुंडी निसर्गात जावुन नशापाणी करीत निसर्गाची मजा लुटायला निघु लागतात.
दारु पिणे, दारुच्या बाटल्या धबधब्यामधे, ओढ्यामधे फोडणे, विकृत चाळे करणे हाच यांचा पुरषार्थ. हीच यांची आनंदाची कल्पना. 
आसुड, एक चाबुक हवा हातात.

निसर्ग आणि दानव


Monday, June 06, 2011

पहिल्या पावसाची जादु

मेघ दाटले

मेघ सह्याद्रीच्या माथ्यावर टकरा देवु लागले आहेत.

एकीकडे


एका बाजुला पाण्याने गच्च भरलेला, दुसरीकडॆ रिकामा.

पांगारा आणि वटवाघळे

पांगाऱ्याच्या एका झाडाला अजुन रेंगाळणारा लाल रंगांच्या फुलाचा बहर आणि त्याच्या पाठीमागचे झाड सारे वटवाघळांनी व्यापलेले.



आणखी एक

राजाभाऊंचे उपोषण

आपल्या नेत्याला साथ देण्यासाठी राजाभाऊंनी प्राणांतिक उपोषणला बसायचा ठाम निश्चय आपल्या मनाशी केला.  आता उपोषण करायचे म्हणजे करायचेच.

आणि मग त्यांचे उपोषण सुरु झाले. आपल्या न्याय मागण्या पुर्ण झाल्या शिवाय आता माघार नाही.

स्थळ. हुतात्मा चौक, मुंबई.
साल - १९८०-८२ असावे.

उपोषणाचा पहिला दिवस. प्रहर पहिला.

उपोषणाला सुरवात झाली. खुप उत्साही वाटत होतं. आपण समाजासाठी हा त्याग करीत आहोत, ही भावना किती सुखद.
आता रिकाम्या पोटी उपोषणाला बसणे नको करुन भरपुर , भरपुर बकासुरी नाष्टा केलेला.  न जाणो परत केव्हा पोटात अन्न जाईल ?

उपोषणाची सुरवात मोठी दमदार झालेली.

उपोषणाचा पहिला दिवस. प्रहर दुसरा.

अजुन राजाभाऊ आपल्या निश्चयावर ठाम आहेत.

दिवस पहिला, प्रहर तिसरा.

आता मागे हटणे नाही, प्राण गेले तरी चालेल.

प्रहर चौथा.

उन्हं वाढत चालली आहेत. पोटातले कावळे फारच वेडॆपिसे झालेले. कसेबसे त्यांना पकडुन ठेवलेले. जरा आडवं व्हाव काय ?

संध्याकाळचे पाच.

प्रकृती पार खालावलीय वाटत. सलाइनबिलाइन लावावी लागते की काय ?

अजुन पर्यंत कसे कोणी फिरकत नाही ? सरकार दरबारची माणसे गेली कुठे ? आणि वार्ताहार , पत्रकार ? कोणीच कसं अजुन पर्यंत दखल घ्यायला आलेले नाही ? या रे या, कुणी तरी मुसंबीचा रस घेवुन या.

संध्याकाळचे सहा वाजले.

राजाभाऊ नुकतेच उघडलेले" सुविधा " जवळच आहे.

एक दिवसाचे साखळी उपोषण समाप्त.

नेत्यानी मात्र उपोषण पुढे सुरु ठेवलेले.

मागण्या काही मान्य झाल्या नाही. गुळमुळीत आश्वासने मात्र पदरात पडली.

फी वाढ व्ह्यायची ती  झालीच.

रस गळीतो

हात, तोंड , शर्ट सारे सारे रसात माखुन राहीले, लवासाच्या वाटॆवर.

ह्या गोड पाखरांचा हट्ट मोडवेना , आणि आजीबाईंचा देखिल.





Wednesday, June 01, 2011

का पण का ? का ?

तुमच्या घरी एखादा समारंभ. आवर्जुन सर्वांना निमंत्रण,
अगदी अगदी आग्रहाचे. 
तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र, तिचे नातेवाईक, तिच्या मैत्रीणी. मुलाचे मित्र.

पण ती कोणाला तरी बोलवायला विसरलेली असते.

तुम्ही आठवण करुन देता " अगं तिला पण बोलव, किंबा अगं तिला बोलवलसं नाही ? "

का पण का ?
का ती तिच्या एखाद्या मैत्रीणीला बोलवायला विसरली असते ?

आधीच मर्कट तशात मद्य प्याला किंवा माकडाच्या हाती आंब

किंवा या राजाभाऊंच डोस्क फिरलयं. पार वेड लागलयं म्हणायचं. कोणत्या जातीचा घेवु नी कोणता नको. कोणता चाखुन पाहुन नी कोणता नाही ? पायरीचा रस ओरपु की राजापुरीचा ? 



लंगडा, चौसा, बदामी, तोतापुरी, लालबाग, दशेरी, पायरी, राजापुरी ते हापुस ,काय बोलाल ते  सारे सारे मांडीला मांडी लावुन ज्या नजाकतीत बिराजमान झालेले होते , अहाहा, मनाचा ताबा सुटला, मन धरुन रहाणॆ कठीण झाले,  हे सारे सारे आंबे  पाहुन राजाभाऊ वेडेपिसे झाले. झालेतर झाले त्यात परत ते एकटॆच "फुडहॉल " मधे गेलेले, अटकाव करायला, नवऱ्याच्या लालसेला बांध घालण्याचे काम करणारी बरें झाले सोबत नव्हती. घेतल थोडे थोडे प्रत्येकी.



दशेरी पासुन सुरवात झालीयं.

शेवट बहुदा आमच्या गावच्या चोखी आंब्याने करावी म्हणतोय.



"फुडहॉल " पॅलॅडीयम मॉलमधे जाण्यास एक नवे कारण मिळाले. 

ता.क.-  हे काय एवढेच ?