अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Thursday, June 09, 2011
Wednesday, June 08, 2011
एक नवे कारण
मुलाला चांगली नोकरी नाही.
मुलगा व्यसनी आहे,
मुलगा दिसायला चांगला नाही,
मुलगा अगदीच बावळट आहे.
मुलाची आई खाष्ट आहे
मुलाचे स्वःतचे घर नाही.
मुलावर पाठच्या बहिणींची जबाबदारी आहे.
आणि आता
मुलगा व्यसनी आहे,
मुलगा दिसायला चांगला नाही,
मुलगा अगदीच बावळट आहे.
मुलाची आई खाष्ट आहे
मुलाचे स्वःतचे घर नाही.
मुलावर पाठच्या बहिणींची जबाबदारी आहे.
आणि आता
मोराची चिंचोली
घन गरजत बरसत आले की वनी मोराचा षडज लागतो, पिसारा फुलवुन आनंदाने नाचु लागतो , हे सारे वाचलेले. ते अनुभवण्यासाठी गाठली ती थेट मोराची चिंचोली.
संध्याकाळचे ५.३०-६.०० चा सुमार.
रस्तातुन जातांना जे आजुबाजुला मोर , लांडोरी पाहिल्या त्याला सुमार नाही.
मजा आली. वातावरण फार आल्हाददायक असल्याकारणे भटकणेही चांगले झाले.
Tuesday, June 07, 2011
निसर्ग आणि दानव
ज्या प्रमाणे पावसाची प्रतिक्षा चातक करत असतो त्याच प्रमाणे बेवडे कंपनी पण करत असते.
पावसाळा सुरु होतोनहोतो तोच दारुड्यांच्या झुंडी निसर्गात जावुन नशापाणी करीत निसर्गाची मजा लुटायला निघु लागतात.
दारु पिणे, दारुच्या बाटल्या धबधब्यामधे, ओढ्यामधे फोडणे, विकृत चाळे करणे हाच यांचा पुरषार्थ. हीच यांची आनंदाची कल्पना.
आसुड, एक चाबुक हवा हातात.
Monday, June 06, 2011
पांगारा आणि वटवाघळे
पांगाऱ्याच्या एका झाडाला अजुन रेंगाळणारा लाल रंगांच्या फुलाचा बहर आणि त्याच्या पाठीमागचे झाड सारे वटवाघळांनी व्यापलेले.
राजाभाऊंचे उपोषण
आपल्या नेत्याला साथ देण्यासाठी राजाभाऊंनी प्राणांतिक उपोषणला बसायचा ठाम निश्चय आपल्या मनाशी केला. आता उपोषण करायचे म्हणजे करायचेच.
आणि मग त्यांचे उपोषण सुरु झाले. आपल्या न्याय मागण्या पुर्ण झाल्या शिवाय आता माघार नाही.
स्थळ. हुतात्मा चौक, मुंबई.
साल - १९८०-८२ असावे.
उपोषणाचा पहिला दिवस. प्रहर पहिला.
उपोषणाला सुरवात झाली. खुप उत्साही वाटत होतं. आपण समाजासाठी हा त्याग करीत आहोत, ही भावना किती सुखद.
आता रिकाम्या पोटी उपोषणाला बसणे नको करुन भरपुर , भरपुर बकासुरी नाष्टा केलेला. न जाणो परत केव्हा पोटात अन्न जाईल ?
उपोषणाची सुरवात मोठी दमदार झालेली.
उपोषणाचा पहिला दिवस. प्रहर दुसरा.
अजुन राजाभाऊ आपल्या निश्चयावर ठाम आहेत.
दिवस पहिला, प्रहर तिसरा.
आता मागे हटणे नाही, प्राण गेले तरी चालेल.
प्रहर चौथा.
उन्हं वाढत चालली आहेत. पोटातले कावळे फारच वेडॆपिसे झालेले. कसेबसे त्यांना पकडुन ठेवलेले. जरा आडवं व्हाव काय ?
संध्याकाळचे पाच.
प्रकृती पार खालावलीय वाटत. सलाइनबिलाइन लावावी लागते की काय ?
अजुन पर्यंत कसे कोणी फिरकत नाही ? सरकार दरबारची माणसे गेली कुठे ? आणि वार्ताहार , पत्रकार ? कोणीच कसं अजुन पर्यंत दखल घ्यायला आलेले नाही ? या रे या, कुणी तरी मुसंबीचा रस घेवुन या.
संध्याकाळचे सहा वाजले.
राजाभाऊ नुकतेच उघडलेले" सुविधा " जवळच आहे.
एक दिवसाचे साखळी उपोषण समाप्त.
नेत्यानी मात्र उपोषण पुढे सुरु ठेवलेले.
मागण्या काही मान्य झाल्या नाही. गुळमुळीत आश्वासने मात्र पदरात पडली.
फी वाढ व्ह्यायची ती झालीच.
आणि मग त्यांचे उपोषण सुरु झाले. आपल्या न्याय मागण्या पुर्ण झाल्या शिवाय आता माघार नाही.
स्थळ. हुतात्मा चौक, मुंबई.
साल - १९८०-८२ असावे.
उपोषणाचा पहिला दिवस. प्रहर पहिला.
उपोषणाला सुरवात झाली. खुप उत्साही वाटत होतं. आपण समाजासाठी हा त्याग करीत आहोत, ही भावना किती सुखद.
आता रिकाम्या पोटी उपोषणाला बसणे नको करुन भरपुर , भरपुर बकासुरी नाष्टा केलेला. न जाणो परत केव्हा पोटात अन्न जाईल ?
उपोषणाची सुरवात मोठी दमदार झालेली.
उपोषणाचा पहिला दिवस. प्रहर दुसरा.
अजुन राजाभाऊ आपल्या निश्चयावर ठाम आहेत.
दिवस पहिला, प्रहर तिसरा.
आता मागे हटणे नाही, प्राण गेले तरी चालेल.
प्रहर चौथा.
उन्हं वाढत चालली आहेत. पोटातले कावळे फारच वेडॆपिसे झालेले. कसेबसे त्यांना पकडुन ठेवलेले. जरा आडवं व्हाव काय ?
संध्याकाळचे पाच.
प्रकृती पार खालावलीय वाटत. सलाइनबिलाइन लावावी लागते की काय ?
अजुन पर्यंत कसे कोणी फिरकत नाही ? सरकार दरबारची माणसे गेली कुठे ? आणि वार्ताहार , पत्रकार ? कोणीच कसं अजुन पर्यंत दखल घ्यायला आलेले नाही ? या रे या, कुणी तरी मुसंबीचा रस घेवुन या.
संध्याकाळचे सहा वाजले.
राजाभाऊ नुकतेच उघडलेले" सुविधा " जवळच आहे.
एक दिवसाचे साखळी उपोषण समाप्त.
नेत्यानी मात्र उपोषण पुढे सुरु ठेवलेले.
मागण्या काही मान्य झाल्या नाही. गुळमुळीत आश्वासने मात्र पदरात पडली.
फी वाढ व्ह्यायची ती झालीच.
रस गळीतो
हात, तोंड , शर्ट सारे सारे रसात माखुन राहीले, लवासाच्या वाटॆवर.
ह्या गोड पाखरांचा हट्ट मोडवेना , आणि आजीबाईंचा देखिल.
ह्या गोड पाखरांचा हट्ट मोडवेना , आणि आजीबाईंचा देखिल.
Wednesday, June 01, 2011
का पण का ? का ?
तुमच्या घरी एखादा समारंभ. आवर्जुन सर्वांना निमंत्रण,
अगदी अगदी आग्रहाचे.
अगदी अगदी आग्रहाचे.
तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र, तिचे नातेवाईक, तिच्या मैत्रीणी. मुलाचे मित्र.
पण ती कोणाला तरी बोलवायला विसरलेली असते.
तुम्ही आठवण करुन देता " अगं तिला पण बोलव, किंबा अगं तिला बोलवलसं नाही ? "
का पण का ?
का ती तिच्या एखाद्या मैत्रीणीला बोलवायला विसरली असते ?
का ती तिच्या एखाद्या मैत्रीणीला बोलवायला विसरली असते ?
आधीच मर्कट तशात मद्य प्याला किंवा माकडाच्या हाती आंब
किंवा या राजाभाऊंच डोस्क फिरलयं. पार वेड लागलयं म्हणायचं. कोणत्या जातीचा घेवु नी कोणता नको. कोणता चाखुन पाहुन नी कोणता नाही ? पायरीचा रस ओरपु की राजापुरीचा ?
लंगडा, चौसा, बदामी, तोतापुरी, लालबाग, दशेरी, पायरी, राजापुरी ते हापुस ,काय बोलाल ते सारे सारे मांडीला मांडी लावुन ज्या नजाकतीत बिराजमान झालेले होते , अहाहा, मनाचा ताबा सुटला, मन धरुन रहाणॆ कठीण झाले, हे सारे सारे आंबे पाहुन राजाभाऊ वेडेपिसे झाले. झालेतर झाले त्यात परत ते एकटॆच "फुडहॉल " मधे गेलेले, अटकाव करायला, नवऱ्याच्या लालसेला बांध घालण्याचे काम करणारी बरें झाले सोबत नव्हती. घेतल थोडे थोडे प्रत्येकी.
दशेरी पासुन सुरवात झालीयं.
शेवट बहुदा आमच्या गावच्या चोखी आंब्याने करावी म्हणतोय.
"फुडहॉल " पॅलॅडीयम मॉलमधे जाण्यास एक नवे कारण मिळाले.
ता.क.- हे काय एवढेच ?
Monday, May 30, 2011
Sunday, May 29, 2011
पुणे डेक्कन सदाशिव लढवय्ये.
आमच्या येथे चेंडुफळीचे सामने खेळण्यासाठी संघ भाड्याने किंवा विकत दिला जाईल.
आमची कुठेही शाखा नाही.
कृपया लक्षात ठेवा.
- एकावेळी एकच संघ सामना खेळण्यासाठी मिळेल. तसेच संपुर्ण संघ एकसंघी मिळेल. एखादाच , किरकोळ, फुटकळ खेळाडु हवा असला तरी मागु नये. दिला जाणार नाही.
- दुपारी बारा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आमची वामकुक्षीची वेळ असल्यामुळे त्यावेळेत आम्ही सामने खेळायला येणार नाही.
- आमचा फलंदाजांकडुन एका षटकात फक्त सहा चेंडु खेळले जातील. त्याला अधिकचे चेंडु खेळण्यास लागले तर जास्तीचा आकार घेतला जाईल.
- आमच्या खेळाडुने षटकार मारल्यानंतर जर का चेंडु सापडला नाही किंवा हरवला तर त्यास आम्ही जबाबदार नाही. कोणत्याही परिस्थितीत नुकसानभरपाई द्यायला आम्ही बांधील नाही. तसेच जर का चेंडु टोलावल्यानंतर त्याचा आकार बदलला, तो वेडावाकडा झाला तर त्याची दाद आमच्याकडे मागितली जावु नये.
- प्रत्येक षटकात आमच्या फलंदाजाच्या अंगावर केवळ दोनच उसळणारे चेंडु टाकले जावेत. जास्तीचे चेंडु टाकले गेल्यास सामना खेळायला आम्ही बांधील नाही.
- प्रतिस्पर्धी संघाने प्रत्येक षटकात केवळ दोनदाच चेंडु सीमेपार धाडण्याचा प्रयत्न करावा. तिसऱ्यांदा आमचा खेळाडु सीमेच्या दिशेने धावला जाणार नाही, आणि जर का आमच्या खेळाडुला चेंडु पाठोपाठ धावाने लागलेच तर त्याचा आकार अलग घेतला जाईल.
- प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला जर का वाटत असेल की आम्ही त्याला झेलबाद करावे तर त्याने चेंडु पकडण्यासाठी चेंडु आमचा खेळाडु जेथे क्षेत्ररक्षण करण्यास उभा असेल त्याच जागी टोलवावा व सरळ जावुन त्याच्या हातात पडेल अश्या रितीनेच मारायला हवा. त्याला झेल पकडण्यासाठी धावायला लावले जावु नये. तसे झाल्यास वेगळा आकार पडॆल.
- आमचा संघ केवळ टी शर्ट व अर्धी चड्डी घालुनच खेळ खेळायला येईल. त्यानी चित्रविचीत्र गणवेष घालावा असे वाटत असेल तर तो गणवेष तुम्ही त्यास शिवुन द्यावा, आम्ही आणणार नाही.
- आमच्या फलंदाजाला शुन्यावर बाद केले जावु नये, जर चुकुन तो शुन्यावर बाद झाला तर त्याला परत खेळण्याची संधी दिली जावी.
- सामन्यामधे आम्ही प्रथम फलंदाजी केल्यास जास्तीतजास्त १७५ धावा काढल्या जातील. प्रतिस्पर्धी संघाने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांनी आपली धावसंख्या फक्त दिडशे पुरती मर्यादित ठेवावी. आम्हाला दिडशेपेक्षा अधिक धावा काढण्यास लावले गेले तर त्याच्यासाठी प्रत्येक धावांमागे अधिकचे पैसे आकारण्यात येतील.
- सामना जिंकण्यासाठी आमच्याने शक्य होतील तेवढेच प्रयत्न केले जातील. सामना हरल्यास तसेच प्रेक्षकांना त्यांचे पैसे वसुल न झाल्याचे समाधान मिळाले नाही तर त्यास आमचा संघ जबाबदार मानला जावु नये.
- प्रेक्षकांनी आपले वर्तन सभ्य ठेवावे. वेडेवाकडॆ वागु नये अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या खेळाडुच्या भावना दुखावल्या जातील असे वागु नये. आमच्या खेळाडुचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.
- या सामन्याच्या प्रक्षेपणदरम्यान दाखवल्या गेलेल्या जाहिरातीवरील उत्पनावर दहा टक्के आमचे कमीशन आकारले जाईल.
वरील नियम व अटी मान्य असल्यासच आमचा संघ भाड्याने / विकत घेण्यासाठी आत शिरावे.
लक्षात असु दे आमची गरज तुम्हाला आहे, तुमची गरज आम्हाला नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे जरी आपण आमचा संघ लिलावात विकत घेतला असला तरी प्रत्येक गोष्टीत आमचा निर्णय अंतिम राहील.
Subscribe to:
Posts (Atom)