Sunday, September 12, 2010

बाप्पा येती घरा




एकीकडे

एकीकडे गणेशोत्सवात करोडो रुपये उधळेले जातात, दुसरीकडॆ गरीबाला उद्याची भ्रांत पडलेली असते.

काय विचार चाललाय ?



या दिवसात केळ्यांना खप भरपुर. वेळेवर बाजारात ती पोचली पाहिजेत

गणपतीबाप्पाची अशीही रुपे





Friday, September 10, 2010

पंचारती करू तुजला गौरीनंदना । हनन करिशी नतजन अध मुषक वाहना ॥

एकदा राजाभाऊ गरवारे महाविद्यालयात वीणा सहस्त्रबुद्धेंच्या कार्यक्रमाला गेले होते.
वीणाताईंनी त्या काळात, स्वातंत्रपुर्व काळात निघणाऱ्या मेळाव्यात जी गाणी म्हटली जायची त्यातले एक गाणे गायले.  त्या गाण्याची चाल राजाभाऊंच्या अगदी अगदी ओळखीची.


आपल्या भसाड्‍या, कंपीत आवाजात ते जेव्हा गजाननासमोर ही आपली आवडती आरती म्हणतात तेव्हा गणपतीबाप्पा नक्कीच आपले कान झाकुन घेत असणार


पंचारती करू तुजला गौरीनंदना । हनन करिसी नतजन अध मुषकवाहना ॥
पंचारती करू तुजला गौरीनंदना ।

शुंडाही चर्चियली सिंधुरे बरी, मुक्ताफळ माळ कंठी दिसते गोजीरी ।

रत्नवलय सुर्यप्रभा दाविती करी ।

दुर्वा ..... गर्वी .... त्याचा, प्रिय तुजला, शशी हसला, मज दिसला , विघ्नक्षालना ।

पंचारती करू तुजला गौरीनंदना । हनन करिशी नतजन अध मुषक वाहना ॥

शोभिवंत लंबजठर कटिसी वेष्टीले , पितवसन एकदंत कर्णी कुंडले ।

पाशांकुश धरुनी करी भक्‍त तारिले ।

विद्या..... देशी .... त्यासी ...... प्रणत तुला ।

मममतिला, करी विमला नागबंधना ।

पंचारती करू तुजला गौरीनंदना । हनन करिशी नतजन अध मुषक वाहना ॥

श्रीमद्वीजभोध्वव असुर सिंदुर ।

घेइ पित्याकडून प्रबळ सावर ।

त्रासविले साधुमुनी विप्रसुखर ।

दुष्टा..... वधशी..... देवा..... शरणा तुला, पुरवी लळा, सुखविमला, मज गजानना ।

पंचारती करू तुजला गौरीनंदना । हनन करिशी नतजन अध मुषक वाहना ॥

Tuesday, September 07, 2010

हवीत कशाला तो लाखो रुपयाचा मोह,

यशोदेच्या नटखट कान्हाबाळाचे दह्यानी भरलेले मटकी फोडुन ते दही मटकवणे. 
तो नटखट्पणा आनंदाने जागवायचा, त्यातली गमंत उपभोगायची सोडुन जीवाशी खेळ करायला सांगीतलाय कोणी ?

आम्ही आहे त्यात समाधानी.

जुंपलयं कामाला .



गुमान तोंडात लाईटी घेवुन गप्प उभे रहा.

मुळातच आपल्याकडॆ वास्तुचे सौदर्य यासंबधी जाणिव कमीच.

विश्रामबाग, पुणे.

थालिपीठ ज्याला ठावुक नाही अश्याने महाराष्ट्रात राहु नये

राजाभाऊंना बिघडवायला दै. सकाळ पण काही अंशी कारणीभुत आहे.
सप्टेंबर ४.   दै.सकाळनी राजाभाऊंची भुक चाळवली. त्यांना घराबाहेर पडण्यास प्रवृत्त केले.
लेख तसाच भारीभक्कम. लीना शर्मा लिखीत " जरा हटके, चवदार थालिपीठ ", सोबत पुण्यात चवदार थालिपीठे कुठे मिळतात  याची भली मोठी यादी.

मग काय राजाभाऊ निघाले ज्ञानप्रबोधिनीच्या दिशेने, सुजन फूड्स मधे, थालिपीठावर ताव मारायला.

हाय रे देवा, नशिबाने डाव साधला. नेमके ज्ञानप्रबोधिनीजवळ गेल्यावर त्यांना त्या जागेचे नाव आठवेनाशे झाले,  त्यात काय मोठेसे, आपण शोधुन काढु.

मग त्यांनी ज्ञानप्रबोधिनी समोर समोशे इ. तत्सम पदार्थ विकणाऱ्याला विचारले.

"येथे कोणाकडॆ चांगली थालिपीठे मिळतात. "

"थाली क्या ? "

"थालिपीठ "

"थालि पे क्या ? "

"अरे बाबा खानेको, थालिपिठ "

"अच्छा, अच्छा, आगे दुर्वांकुर मे थाली खानेको मिलेगा. "

मग पेटलेले राजाभाऊ तेथुन निघाले ते टिळक रस्तावरच्या त्यांच्या आवडीच्या जागी, ग्राहक पेठेत, कटलेटस खायला.



असे एका कटलेटनी कधी कोणाचे पोट भरते काय ? ते तर केव्हाच दाढेच्या कॅवीटी्त गेले, पोटापर्यंत पोचायचे कसे ?

राजाभाऊंच्या बायकोला तुळशीबागेत खरेदीला जायचे होते. आता तु्ळशीबागेत गेल्यावर जोश्यांच्या श्रीकृष्ण मिसळ मधे मिसळ खायला न जाणे होईल काय ?

लक्ष्मी रस्तावर चालत, चालत, चालतांना त्यांना अचानक खुप तहान लागली. 
जनसेवा दुग्धालय आणि मसाला दुध.  
सोबत उपवासाचा पॅटीस



Sunday, September 05, 2010

मराठी माणसांनो , मराठी जगवा

मराठी माणसांनी ( आणि त्यांच्या मराठी नेत्यांनी सुद्धा ) आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालावे ही मागणी घेवुन शाळेतली मुले रस्तावर आली.

जवांमर्द कोल्हापुरी मिसळ ते सुपर डूप्पर हूप्पर बटाटावडा

गृहीणींनो, जेव्हा आपणाच बनवलेला स्वयपाक आपल्यालाच खाण्याचा कंटाळा येतो ना तेव्हा ..







गृहीणींनी जेव्हा आपणाच बनवलेला स्वयपाक आपल्यालाच खाण्याचा कंटाळा येतो तेव्हा ..

गुलाब प्रदर्शन- टिळक स्मारक, पुणे



सध्या रोज सोसायटी ऑफ पुणे यांनी गुलाबाचे प्रदर्शन भरवले आहे

सज्जाड दम भरणे म्हणजे काय हो राजाभाऊ ?

राजाभाऊ अजुन उशीर आहे.

राजाभाऊ आत्ताशी गणपती येवुन ठेपले आहेत, नवरात्र फार लांब आहे हो, जरा धीर धरा.

आत्ताच एवढा मस्त दिसतोय तर जेव्हा हा भरेल तेव्हा काय असेल ?

केव्हा केव्हा असं वाटते



वाटते की आत्ता ह्या क्षणी आपल्याकडॆ चांगला कॅमेरा असता तर हे दृष्य किती छान टिपता आले असते.

धारे वरुन उतरणारे हे सर्व.

डुरक्या

"वळु" चित्रपटातचे चित्रीकरण या चाळकेवाडी परिसरातले.

चित्रपटाचे काम संपल्यानंतर हा वळु येथेच राहिला की काय ?

आणि आता तो चांगलाच माणासाळलाय की काय ?

यानी केला घात



चाळके वाडी ते बामणोली, स्वर्ग केवळ स्वर्ग , त्याची वाट लागायला कारणीभुत आहेत याची वेष्टने व त्यातले खाद्यपदार्थ खावुन झाले की बेदरकारपणे निसर्गात त्यांना जागोजागी फेकणारी महामुर्ख माणसे.

उपाय एकच. आसुड. आसुडाचा मार.

सज्ज्नगडाचे दुर्जनांनी केलेली दशा

सज्जनगड, समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने धन्य झालेला गड.

आता पर्यंत या किल्लाने अनेक परकीयांची आक्रमणे सहन केली, परतवुन लावली, परत स्वकीयांच्या ताब्यात तो आला.

पण.

कालाय तस्मे नम:

स्वकीयांकडुन होणाऱ्या आक्रमणापासुन, त्यांनी चालवलेल्या हेळसांडपासुन आता मात्र सज्जनगड स्वताचे रक्षण करायला कमी पडतो आहे.

लानत है ! लानत है "

माथ्यावर जिथे गाड्या उभा रहातात तिथेच लावलेल्या दोन भल्या मोठ्या जाहिरात फलकांनी त्याला झाकुन टाकलयं, आणि वर जी गडावर दुर्दशा झाली आहे त्यासाठी समर्थांच्या मदतीला आता गाडगेमहाराजांना हाती खराटा घेवुन यावे लागणार आहे.

प्रवेशद्वारावरच्या दोन तळ्यांमधे समर्थ नक्कीच स्नान करत असणार आणि आज त्यांचा काय अवतार झाला आहे !







आणि समर्थांची समधी, श्रीराम मंदीर यांच्या देखणेपणात या वेड्यावाकड्या लावलेल्या , पसरलेल्या तारा बाधा आणत आहेत.

पाऊस असल्यामुळे जास्त फोटो काढता आले नाहीत.

हि अस्वच्छता नाही बघवत.

सज्जन गड, ठोसेघर, चाळकेवाडी, आणि कासचे पठार

अशक्य ! त्रिवार अशक्य. शनिवार-रविवार आणि राजाभाऊ घरात ? छे, हे कसे काय शक्य आहे ?

मांढरदेवच्या पठारावर झालेल्या या पावसाळ्यातील पदभ्रमंतीमुळे ही लागलेली चटक घरात स्वस्थ बसुन देणे नाही, हा भटकंतीचा कीडा जेव्हा डोक्यात वळवळू लागतो तेव्हा तो आपल्या तब्बेतीचा, आपल्या मुलाचा प्रकृतीचा पण जरासुद्धा विचार करत नाही, त्याचे पाय आपोआप वळु लागतात जंगलाच्या वाटेकडॆ , एका अनामिक ओढीने. तो निसर्ग भरभरुन आपल्यामधे साठवुन घेण्यासाठी , आठवणींवर पुढील साऱ्या वर्षाची बेगमी करावयास.

कासच्या पठारावर फिरायला जायचे म्हणजे जायचेच, मागचा पुढचा कसलाच विचार आता करणे नाही, ती रानफुले साद घालु लागली आहेत, चाळकेवाडीच्या पठारावरचा भन्नाट वारा वेडेपिसा करायला लावणार आहे, होश उडवणाऱ्या पवनचक्यांचे दृश्य मनात साठवायचे आहे, ठोसेघरच्या धबधब्याची मोहीनी डोळ्यात साठवायची आहे, गच्च धुक्यात , भरल्या ढगात हरवुन आणि हरकुन जायचे आहे, कधी एकदा खळखळ वहाणाऱ्या अवखळ झऱ्याच्या ठंडगार पाण्यानी आपली तृषा शमावतो असे झाले आहे. ते मदहोशी वातावरणात भुरळ घालुन घ्यायची आहे आणि समर्थांचे ही दर्शन घायचे आहे, बामणोलीचा शिवसागर जलाशय, या पर्वतरांगांवरुन खालच्या दरीत दिसणारे धरणातील पाण्याचे दृश्य डोळे भरभरुन पहायचे आहे , वाटेत यवतेश्वर, घाटाई देवीला भेट द्यायची आहे आणि जमल्यास बामणोलीवरुन जो अप्रतिम रस्ता महाबळेश्वरला जातो त्यावरुन प्रवास करायचा आहे. ( हा रस्ता जवळजवळ ४० कि.मी. असुन बराचसा कच्चा आहे व त्यावरुन फार तुरळक वाहतुक असते , थोडे जोखमीचे काम )



मग काय , राजाभाऊ सुटले तडक सुटले.

भाड्‍याच्या गाडीच्या तकलफीमुळे निघायला अंंमळ उशीरच झाला, त्यामुळे वाटेवर असुन देखील यवतेश्वर, घाटाईदेवी, शिवपेठेश्वर, बामळोली राहुन गेले, ( हे खरच राहुन गेलं की परत या परिसरात येण्यासाठी काहीतरी सबळ कारण हवे म्हणुन मुद्दामुन ? )

पण एकंदरीत या भ्रमंतीमधे खुप बहार आली, खंत एकच की वेळे अभावी पायी फारसे जास्त भटकता नाही आले, त्यात जरा लवकर गेल्याने, पाऊस अजुन सरला नसल्याने जास्त प्रमाणात रानफुले अजुन उगवली नव्हती )



ता.क. आज यवत जवळील भुलेश्वर परीसरात भटकायला जायचे होते, पण , पण अलिकडे त्यांच्या बायको जर्राशी, काहीशी एकंदरीत थंडावली आहे, उंबरगड चढणे राजांभाऊंसाठी शक्य नाही झाले. होता है होता है, ऐसाभी कभी कभी होता है !



ठोसेघरचे श्री. माने.

कासच्या पठारावर जेवण मिळेल न मिळेल, तु आपले जेवण बरोबर घे. "

राजाभाऊंनी आपल्या बायकोला हुकुम फर्मावला.

त्या भल्या बिचाऱ्या ( ???? ) बाईने भल्यापहाटॆ लवकर उठुन सर्वांसाठी भाजी केली. मस्तपैकी आज पावभाजीचा बेत, कुठेतरी गवताळ कुरणात बसुन, नाही तर एखाद्या देवळाच्या ओट्यावर (घाटणदेवीच्याच की ) आश्रय घेत, मजा येणारं, आज वनभोजनाचा खास खासा बेत.

राजाभाऊंना काय स्वप्न पडले होते आज आपल्या नशिबी आपल्या समोर ताटात काय वाढुन ठेवले आहे.
ठोसेघरला धबधब्याऐवजी या पावसाने चांगलचं भिजवुन सोडले, भिजल्या अवस्थेत त्यांनी रस्तावर समोर एक घर पाहिले, घरात असलेला काऊंटर पाहिला, काऊंटर मागे उभे असलेले गृहस्थ पाहिले आणि अचानक जाणिव झाली "अरे आपल्याला चांगल्यापैकी चक्क भुक लागली आहे.
राजाभाऊंनी त्या गृहस्थांकडॆ विचारपुस केली की आम्हाला घरुन आणलेले जेवण जेवण्यासाठी बसायला जवळपास कुठे एखादे देऊळ, शाळा वगैरे आहे का ? हे एक उपहारगृह आहे ह्याची दखल घेणॆ ते भुकेपोटी आणि त्यात डोळ्यासमोर पावभाजी दिसत असल्याने विसरुन गेले.

पण, आज त्यांच्या नशिबी पावभाजी नव्हती.

श्री.मानेंनी उदार मनाने त्यांना आपल्या जागेत बसुन जेवणाची परवानगी दिली. ते म्हणाले की थोडेफार आमच्या कडुन काहीतरी घ्या आणि मात्र येथे सारे स्वच्छ ठेवा.

थोडॆफार. हं. थोडॆफार. घेवु की. एखादी मिसळ किंवा एकादे थंडपेय. घेवु काय तरी. राजाभाऊंनी विचार केला.

गरमागरम मिसळीचा पहिला घास, पावसाळी हवेतील वाफाळलेल्या भातावरील आमटी आणि घेतलेला भुरका, पिठले भाकरी, एका मागोमाग ऑर्डर सुटत गेल्या, मागण्या वाढत गेल्या, या मस्त, चविष्ट, गरमागरम जेवणासमोर आणलेली पावभाजी पोटात कुठेतरी खोलवर तळाशी कोपऱ्यात जाऊन बसली, (थंडगार झालेली भाजी, नको गं , मी आपला डाळ भात खाईन, राजाभाऊ वदले )



 
मजा आली.

आता परत ठोसेघर, चाळकेवाडीला जायचे झाले तर पहिले पाऊल श्री.मानेंच्या घरी, जेवणाची आगावु मागणी करावयास.