Monday, May 09, 2011

मोक्ष

शनिवारी रात्री राजाभाऊ अगदी मनापासुन जेवले.
 तबीयत खुष झाली.

ही अशी "मोक्ष" ची पॉश जागा हॉटेल बघीतल्यानंतर ते तसे आत शिरण्यास नाखुषच होते. सोबत माणसे होती भरपुर.  त्यांच्या मुलाने येथेच जेवायचे करुन आग्रह धरला.  (हल्ली पोराचं ऐकावं लागतं )

मग काय. सर्व जण " ३६० " मधे बसलेले उठुन "मोक्ष" मधे गेले.पोरानी त्यांना नेले  ते नेले ,  त्यांच्या पोराला नक्कीच वाटलं असणार झक मारले आणि आपण येथे ह्याला घेवुन आलो.शंभरवेळा तरी राजाभाऊंनी "बरं झाले आपण येथे आलो ते , मजा आली, मला  हे खुप आवडलं  " करत त्या पोराला ज्याम वैताग आणवला. ( हा सारा वयाचा परिणाम )  

"मोक्ष" मिळणे तसे महाकठीण. 

 पण हे वरच्या मजल्यावर मागच्या बाजुला असलेले "मोक्ष" राजाभाऊंना अगदी योगायोगाने सहजपणी सापडले . विक्रोळी, लालबहादुर शास्त्री मार्गावरील "होम टाऊन " मधे ते गेले खरे खरेदी करण्यासाठी  जातात काय नी " मोक्ष" मिळते काय.  दुपारी "आस्वाद" मधे आकंठ भोजन झालेले, तशी जेवणाची इच्छा म्हटलं तर नव्हती. आता काहीतरी खायचंच आहे तर "३६० " मधे खावु करत ते आत शिरलेले.

बसल्याबसल्या राजाभाऊंचे लक्ष बाहेर गेले. काय भानगड आहे बघुया खरं करत ते व त्यांचे चिरंजीव "मोक्ष" मधे शिरले.

नुकतेच सुरु झालेले हे हॉटेल. नवेकोरे. उत्तम सजावट खाण्याची आणि जागेची देखील, सर्वोत्तम खाणे, व त्यावर कडी म्हणजे तेथल्या कर्मचारावर्गांकडुन मिळालेली. पर्सनल टच असलेली अतीउत्तम वागणुक.  सर्वात भावले असेल तर त्यांचे बाहेर गच्चीवर असणारी बसण्याची व्यवस्था. चांदण्याराती कुणीतरी सोबत असावे, गप्पा मारत मारत जेवावे.

जेव्हा राजाभाऊंनी मेन्यु वाचायला सुरवात केली त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, वाटलं आता न जेवता पोट भरते की काय ? महांगाई के जमाने मे ?

ही अशी स्वस्ताई कुठे पाहिली नव्हती हो. जणु पंचतारांकीत असलेल्या ठिकाणी उडप्याचे दर ? यह सरारस नामुमकीन है. कोणीतरी चिमटा काढा रे.

सुरवात केली. चेरी टॉमेटो सुप नी . चला नांदी मस्त रंगली. आता " वर्जीन मेरी " ची काय गरज होती का ? पण नाही राहवल त्यांच्याचाने. 
मग पुढे आले ते "अंगारी आलु " , येथे राजाभाऊंनी एक गंभीर चुक केली. एकच डिश मागवली चौघांमिळुन. त्यांच्या वाट्याला मग काय ते येणार ? याची चव खुप छान होती.  

जेवणात "अंगुरी कोप्ता " व "कलानी पनीर इन भुना ग्रेव्ही " येथे राजाभाऊंचे व त्यांच्या बायकोचे मतभेद झाले, कोणती भाजी जास्त चांगली लागते यावरुन.  आता जीरा राइस व डाल काबीला मागवण्याची काय तस बघायला गेलं तर गरज नव्हती, पण मागवले गेले खरे. उगीचच आपलं प्रत्येकाला पळीभर पळीभर. 

या इथे  सोबत असणाऱ्या मांसाहरी मंडळींची तर काय अगदीच चंगळ झाली. काय काय मागवले आणि किती मागवले व एकंदरीत राजाभाऊंनी आपल्या मेव्हण्याला कितीला नागवले याला सुमार नाही.

एकंदरीत या "मोक्ष" मधे जेवण अगदी आनंददायी झाले. 
बहार आली. 











   


5 comments:

रोहन... said...

वा.. उगाच नाही तुम्ही पंत... ह्या अश्या जागा कुठून शोधता तुम्हालाच ठावूक... :)
आता एक काम करत जा... जाऊन आलात की गुगल map मध्ये जाऊन ती जागा शोधायची आणि त्याचा नकाशा सुद्धा पोस्टमध्ये टाकायचा... :) म्हणजे आम्हाला जायला बरे पडेल ना!!!

Vikram said...

I second Rohan's comment 2000 times.. maps is must !!

Ugich Konitari said...

http://mumbai.burrp.com/listing/moksh-restaurant_vikhroli-west_mumbai_restaurants/12914986980__MA##listing

Varsha said...

mala jayche ahey ata moksh madhe!

HAREKRISHNAJI said...

वर्षा,

जरुर जा. पण त्या आधी त्या होम टाऊन मधे भरपुर खरेदी करायला हवी