राजाभाऊंचे ज्ञान या ऋतुत फुलणाऱ्या झाडांमधे फक्त चार पाच झाडांपुरते मर्यादित.
हे काही खरं नव्हे, त्यात ते आज मुंबईमधे होते. मग ते पोचले कुलाब्याच्या सागर उपवनामधे. मेधा कारखानीस यांनी तेथे वृक्षांची ओळख करुन देण्यासाठी कार्यक्रम आयोजीत केलेला.
आता उद्याला सकाळी राणीच्या बागेत फुले बघायला
अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Saturday, April 30, 2011
राजाभाऊंच्या नशिबी
राजाभाऊंच्या नशिबी काय आज आमटीभात खाणे नव्हते.
ऑबेरॉय मॉल मधे दुपारी राजधानीमधे भरपेट भोजन झालेले.
राजधानीचा त्यांना आलेला निरोप, "आमरस पुरीचा बेत आहे, तेव्हा येणे करावे "
आणि नेमके त्याच वेळी योगायोगाने त्यांच्या माजी सहकाऱ्यांसोबत बाहेर जेवायला जाण्याचा बेत.
आणि नेमके त्याच वेळी योगायोगाने त्यांच्या माजी सहकाऱ्यांसोबत बाहेर जेवायला जाण्याचा बेत.
पण आजचा दिवस तसं म्हणायला गेलं तर फारसा उत्साही नव्हता.
राजधानीमधे आज जेवण वाढणे फार वेळखाऊपणाचे झाले होते.
जेवायला सुरवात करण्याच्या वेळी छोट्या छोट्या वाट्यांमधे वाढलेल्या इवल्याशिवल्या भाज्या.
जेवण संपायला आले तरी त्या वाट्यांना आपण परत केव्हा भरल्या जाणार याची वाट बघायला लागणे, मग अश्या वाट बघणाच्या काळात साऱ्या भोजनाची पुरती वाट. जेवणातील मजा गायब.

एकदा श्री. सिद्धार्थ काक नी लिहिले होते, " अरे माझ्या घरात उपहारगृह सुरु झाले आहे "
ते पुर्वी या घरात रहात असत. त्यांच्या जागेत "डायनॅस्टी " आलयं.
ते पुर्वी या घरात रहात असत. त्यांच्या जागेत "डायनॅस्टी " आलयं.
राजाभाऊं हे चायनीस जेवणवाले "डायनॅस्टी" काही फार पसंद करत नाहीत,. हे हॉटॆल लोकांच्या आवडीचे. फार लोकप्रिय.
राजाभाऊंच्या मते त्यांना जसं जेवण हवे असते तसं नसतं.
Fine Dinning experience काही येणॆ नसते,
राजाभाऊंच्या मते त्यांना जसं जेवण हवे असते तसं नसतं.
Fine Dinning experience काही येणॆ नसते,
एकतर येथे खुप गर्दी असते, प्रतिक्षेचा काळ ् मोठा असतो.
आज रात्री म्हटलं साधे जेवण जेवावे. आमटीभाता सारखे दुसरे काय असु शकते. पण ते त्यांच्या नशोबी नव्हते.
Thursday, April 28, 2011
मसाई और दाजीपुर - भोज्याला शिवुन परत
या आपल्याला हवे तेथपर्यंत नुसताच प्रवास करत जाणे आणि काहीच न बघता परत येणे.
पण ह्यातुन येणाऱ्या निराशेतुन राजाभाऊ एक धडा शिकले.
आपण ज्यांना सोबत घेवुन जात आहे त्यांचे पण भान राखणॆ, त्यांची फरफट आपल्याबरोबर न करणे, जरा त्यांचा पण विचार करणॆ, आपल्याला हवे तेच करत रहाण्याची वृत्ती जरा बाजुला ठेवणॆ.
फार फार उशिरा हे त्यांच्या ध्यानी आले किंवा त्यांच्या ध्यानात आणले गेले.
Tuesday, April 26, 2011
चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय
अनेक वर्षे मनाशी धरलेली इच्छा अखेर पुरी झाली. चंद्रकांत यांनी काढलेली चित्रे पहाण्यासाठी मन आसुसलेले. मधे केव्हातरी नेहरु सेंटर मधे कला प्रदर्शनात त्यांची काही चित्रे पाहिलेली. पण त्यांच्या वास्तुत जावुन ती पहायची होती.
कोल्हापुरला जाण्याचे हे एक मुख्य कारण.
बाबा गजबर, चंद्रकांत, सुर्यकांत हे सारे राजाभाऊंच्या काकांचे जिव्हाळ्याचे विषय. ते या साऱ्या कलांवतांबद्द्ल ओढीने सांगायचे तेव्हा तेव्हा राजाभाऊ त्यांची थट्टा करत आलेले.
पण आता त्यांची यापुढे मस्करी नाही करणार.
रंकाळा
दै.सकाळनी पंचगंगा स्वच्छ करण्याची मोहीम नुकतीच सुरु केली. रंकाळ्यावर पण परत स्वच्छता अभियान राबवण्याची गरज आहे.
Monday, April 25, 2011
चहा, पोहे आणि गोड शिरा
"माझी काय मस्करी करता व्हयं ? "
राजाभाऊंनी गाडगीळांना विचारले.
आता भल्यापहाटे जेथे सारे झोपले असतील अश्या वेळी आपले दुकान उघडुन भुकेल्यांची भावीकांची पोटापाण्याची सोय करणे आणि ते पण फक्त ?
फक्त पाच रुपयात ?
एक प्लेट पोहे, एक प्लेट शिरा व पोहे मिक्स, आणि चहा.
बील फक्त चवदा रुपये . फक्त चवदा रुपये , फक्त ?
पोहे पाच रुपये प्लेट ? कोणत्या जमान्यात आहेत हे ?

वाहा रे माझ्या पट्ठ्या
अजुन पर्यंत काही कोल्हापुरचा फील येत नाही असा विचार करुन राहिलेल्या राजाभाऊंनी तडक वाट पकडली ती मोतीबाग तालिमीची. आपण ही एकदोन डाव टाकु असा विचार करणारे राजाभाऊंनी प्रत्यक्ष वेळ आल्यावर माघार घेणे जास्त पसंद केले.
कोल्हापुरात राजाभाऊंना कोणती गोष्टे भावली असेल तर तेथल्या माणसांचा प्रेमळ, मनमिळावु, मदतीला सदैव तयार असलेला स्वभाव. खुप चांगल्या स्वभावाची माणसं त्यांना भेटली.
श्री. मुकंदराव सिताराम करजगार यांनी अगदी आपुलकीने राजाभाऊंना तालीमीची सारी माहिती दिली. बऱ्याच पहेलवानांनी राजाभाऊंना त्यांचे फोटो काढुन दिले.

Subscribe to:
Posts (Atom)