Sunday, August 10, 2008

काम करतांना मन ताजे, प्रफुल्लीत रहाण्यासाठी


आग प्रतिबंधक साधने

इमारती मधे नुसतीच आग प्रतिबंधक साधने ठेवुन , देवुन चालत नाही तर सुरक्षततेसाठी ती सदैव सुसज्ज अवस्थेत ठेवावी लागतात.

नाहीतर त्याची अवस्था ही अशी होती.

नशा सुरांची - जोहराबाईंच्या आवाजाच्या जादुची


या श्रावणातील पावसाळी मदहोशी वातावरणात "नशा" हवीच. कोणाला नशेसाठी सुरे च्या आहारी जावेसे वाटते तर माझ्यासारख्या दिवाण्याला सुरांची नशा हवेहवेशी वाटते.

सुरांनी भारावुन जायला या धुंदभुंद वातावरणात कोणाला ऐकायचे ? कोणती गाणी ऐकायची हे त्या त्या वेळेच्या मनाच्या तरल अवस्थेवर काहीसं अबलंबुन असते. कधी नुरजंहाशी जवळीक साधावीशी वाटते "आ घटा काली घाटा अबके बरस ना बरस , मेरे प्रितम परदेश " तर कधी लता रुलावुन जाते.

लेकीन आज मन बडा जिद कर रहा था "जोहराबाई अंबालावाली" ची गाणी ऐकण्याची. एकापेक्षा एक अनेक सुरेल गाणी त्यांनी गायली आहेत.

सामने गली मे मेरा घर है, पता मेरा भुल ना जाना - मिर्झा सायबान
सुनोजी प्यारी कोयलीया बोले - संन्याशी
चले गये चले गये दिल मे आग लगाने वाले चले गये - पहले आप
मोरी बाली उमरीया - नतीजा
कौन जीवन मे मेरे - हमारा संसार.
हे झाले मनाचे चोचले.
य रंगील्या माहोल मधे मग कधीतरी "कांद्याची भजी " होवुन जावु द्या ही फरमाईश करावी लागते.

पुण्यातील मराठी माणसे

पुण्यातील मराठी माणसे एकदम हिंदीतुनच बोलायला सुरवात का बरे करतात ?

दुकानांवरील पाट्या मराठीतच हव्या ?

दुकानदारांनी आपल्या दुकानांच्या प्रथमदर्शनी पाट्या मराठीतच लिहायला हव्या या मागणीने सध्या जोर पकडला आहे.

पाट्या मराठी भाषेत लिहील्या जाव्यात का देवनागरी लिपीत ? हे ठरवणे जरा पंचाईतीचे झाले आहे

"BIG BAZZAR" हे "बिग बाजार" म्हणुन लिहावे का "मोठा बाजार " ?
"SHOPPERS STOP " म्हणजे "शॉपर्स स्टॉप" की "खरेदीकरांचा थांबा ?
"Reliance Fresh " की " ताजा रिलायंस" ?
"WEST SIDE " - "वेस्ट साईड " की " पश्चिम बाजु "

आणि "मॉल" म्हणजे "मॉल" च लिहायचा काय ?

या आशयचे एक अप्रतिम पत्र लोकसत्ता मधे प्रसिध्य झाले होते. मुळ कल्पना ही त्या पत्रलेखकाची. त्याच्या मुद्देसुर लिखाणावर मी बेहद्द खुश झालो आहे.

दे धक्का !!!: प्यार का PC...#c4941096504328668766

झक्कास,

काय मस्त लिहीलय सुनील जाधवांनी.

मान गये उस्ताद.

दे धक्का !!!: प्यार का PC...#c4941096504328668766

बेडेकरांच्या मिसळीचा पुन्हा एकदा दणाका

बेडेकरांची मिसळ खाण्याचा योग या जन्मी तरी दिसत नाही.
व्यावसाईक आपला व्यवसाय जोरात चालावा यासाठी अनेक कारणे , मार्ग शोधत असतात, तर बेडॆकर मला वाटते आपले उपहारगॄह बंद ठेवण्यासाठी.
"पाणी संपल्यामुळे आज आमचे दुकान बंद राहील "
बेडेकरांकडे मिसळ खाण्यासाठी जाण्याची व बंद दुकान किंवा "संपली’ हे ऐकुन परत येण्याची ही सहावी वेळ.

बाल कामगार



बालकांकडुन कामे करुन घेण्यास कायद्याने मनाई असली तसेच मानवतेच्या दॄष्ट्रीकोनातुन मुलांना राबवुन घेणॆ कितीही चुकीचे असले तरी हाउसींग सोसायट्यांमधे लहान मुलांना सर्रास कामाला जुंपले जाते.
वर्तमानपत्रे , दुध घरपोच करण्यासाठी, गाड्या धुण्यांसाठी आदी कामे बालकांकडुन करवुन घेतली जातात, कारण एकच या शोषणासाठी फार कमी पैसे मोजावे लागतात.


Saturday, August 09, 2008

जुना बाजार


बॅगेची खरेदी चाललीय वाटत ?

३००० कोटी ते ३०० कोटी

राजाभाऊ, राजकारण मोठे गहन हो।

३००० कोटी ची जमीन केवळ ३०० कोटीला खैरात करण्याचे घाटत आहे आणि केवळ राणॆ सरकार एकटॆच त्या साठी राजकारणाच्या खेळीत सर्व पणाला लावत आहेत। इतर मंडळी मजा बघत आहेत।

गरीब , भुमीहीन, रहाण्यासही जागा नसलेल्या गोरगरीबांना कधी सरकार अशी जमीन का बरे दान देत नाही ? केवळ श्रीमंतानांच दान का बरे केले जाते ?

Friday, August 08, 2008

ऑलिंपिक

आता पुढील काही दिवस ऑलिंपिक फिव्हर असेल , मग दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे चर्चा सुरु होईल, भारत एक महासत्ता, महाकाय देश, पण ऑलिंपिक मधे पदके मिळवु शकत नाही, का , कसे, काय करायला हवे, होते इ.इ।
मग ऑलिंपिक संपेल, चर्चेला पुर्णविराम मिळेल, ते पुढील ऑलिंपिक पर्यत।
मधल्या काळात येरे माझ्या मागल्या ।
५० खेळाडु व २०० औफिसिअल्सचा ताफा .

आज ०८-०८-०८ आणि वजनाचा काटा ८० ला टच

काल अस्म्मादिक चक्क बस पकडण्यासाठी चांगलेच अंतर धावले। सहा - सात महीन्यापुर्वी ही एक अश्यक्य कोटीतली घटना होती ।
९२ किलोचे धुड , हले दुले , गजगती चाले , साधे चालतानाही धापा लागायची मग धावणे तर दुरच।
हे परिवर्तन घडलेच कसे ?
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे। पण हे करायचे असते ते कोणीतरी सांगायला हवे व कसे करायचे तेही।
हे काम केले दोन ब्लोगर्सनी। वैशाली आणि संगीतानी, त्यांची प्रेरणा व मार्गदर्शन।
भरपुर चालणे व ह्विगन आहाराशैली यांनी अखेर कमाल करून दाखवलीच ।
एक जमाना असा होता वाढलेल्या वजनाबरोबर मिळालेल्या सर्व व्याधि मागे लागल्या होत्या , सदैव दुर्मुखलेला, कंटाळलेला, नैराश्येने पछाडलेला, नकारात्मक विचाराने भारलेला, सारे मानसिक रोग , शारीरिक व्यथा घेवुंन रडत रखड्त दिवस पार होत होते ।
पण आता
आयुष्य किती सुंदर आहे।

Thursday, August 07, 2008

प्रदर्शन व विक्री रेशीम हातमाग वस्त्रे

सद्ध्या एक छानस प्रदर्शन भरलय , वल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे , रेशीम हातमाग वस्त्रे , साडया, ड्रेस मटेरियल , आदीच।

गढ़वाल, धरमावरम, पोचमपल्ली, मुंगासिल्क , टसर, कांथा , मदुबनी प्रिंट्स, कोसा सिल्क, पटोला, चिंतामणि, चंदेरी, महेश्वरी, पैठनी, बोमकाई , संबलपुरी, कांजीवरम, तनछोई, जमदानी, बालुचारी, काय मागाल ते हजर आहे, सबंध भारतातुन येथे व्यापारी आले आहेत उत्मम साडया विकायला, त्यात परत विकास आयुक्त, (हातमाग) वस्त्र निर्माण मंत्रालय, भारत सरकार यांनी हे प्रदर्शन भरवले असल्यामुळे रेशमाची ही खात्री आहे।
जर का माझ्या बायकोला कळल की मी हे प्रदर्शन बघायला गेलो होतो तर मग " काण्या खल्लास "

Saturday, August 02, 2008

अस्सा सुरेख चवदार श्रावण ग बाई


श्रावण मास ! हर्ष काय फक्त मनीच दाटतो होय ? या दिवसात खाद्यपदार्थांची नुसती लयलुट असते। जिव्हा सकट सारी पंचेद्रिय कशी सुखावली पाहिजेत।

पहिला श्रावण शनिवार। ऐरोळी, मुगाचे बिर्डे, तुरीची दाल व हळद घातलेला पिवळा बासमती तांदळाचा भात , गोड लिंबाचे लोणचे, चटणी, नारळाच्या दुधातले केळे, नारळाची चोय घातलेली वटाणा बटाटा भाजी ।

बस और क्या चाहिये जीने के लिए ?


(ता.का। सासुबाईंचा ओरडा खावा लागायाचा तो लागलाच। मुगाचे बिर्डे हे श्रावणी सोमवारी करायचे असते शनिवारी नाही । )

Friday, August 01, 2008

सूर्यग्रहण

आज सूर्यग्रहण होते । एक साधी सरळ खगोलीय घटना। पण या निम्मिते अनेकांना चेव चढतो, मग लोकाच्या अंधश्रद्धाशी त्यांचा खेळ सुरु होतों।

नेमका ग्रहण बघायचा चश्मा घरी राहिला व एका सुंदर दृष्याला मी आज मुकलो।

http://batmidar.blogspot.com/2008/07/blog-post_31.हटमल यांनी फार चांगल लिहिले आहे या विषयी

हार्दिक अभिनंदन डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांचे







महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात माडिया गोंडांसाठी रुग्णालय आणि शाळा चालविणाऱ्या डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे या दांपत्याला यंदाचा प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार आज जाहीर झाला

Tuesday, July 29, 2008

जन्मासिद्ध हक्क


जगाच्या उलटे जाणे हा आमचा जन्मासिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो बजावणारच। भले मग अपघात का होईना आम्हाला त्याची काय परवा ?

तुलशी बाग़ व जुना बाजार

केवढी ही तोबा गर्दी ? लोक तुलशी बागेत ( आम्ही देखील ) जावुन एवढी काय खरेदी करत असतात ?

Monday, July 28, 2008

घुमढ घुमढ गरज गरज

घुमढ घुमढ गरज गरज बरसन को आयो मेघा

ऐसोही झरन लागे पीया बिन मोरे नैना ।

पुन्हा एकवार सह्याद्रीच्या माथ्यावर टकरा घेवू लागले आहेत मदमस्त पाण्याने भरलेले मेघ , धरतीला तृप्त करण्यासाठी



दिवाडकरांचे बटाटे वडे



कर्जत व दिवाडकरांचे बटाटे वडे हे मुंबई - पुणे ट्रेन प्रवासातले एक अटूट नाते। पण अलीकडे या दिवाडकरांच्या बटाटे वड्याची मजा साफच गेली आहे ।

सज्जड दम - एक पुणेरी पाटी


Wednesday, July 23, 2008

गणेशोत्सवातील पैशाची उधळपट्टी थांबवा

यंदाला मान्सुननी दगा दिला असल्यामुळे आपल्या राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिति निर्माण झालेली असून दिवसेंदिवस काळ कठिण होत चालला आहे। अश्या खडतर वेळी आपण आपले सणवार फार साध्यापणे साजरे करायला हवेत। उधळापट्टी टाळायला हवी ।
आपल्या हौशेखातिर गणेशोत्सवात करोड रुपये अउत्पादक मुल्यासाठी खर्च होतात, या वर्षी आपण हां उत्सव जर का साध्यापणे साजरे केला व हे वाचवलेले पैशे आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांना मदत म्हणुन पाठवल्यास , आपण खरी देवपूजा केल्यास पुण्य लाभेल ।

Tuesday, July 22, 2008

नौटंकी

संसदेत चाललेली नौटंकी बघुन सारे जग आज आपल्याला हसत असेल ।
नकोत ते लहान सहान पक्ष, व त्यांची थेरे ।
या प्रादेशिक पक्षाच्या कडबोलीच्या प्राश्वभूमिवर आपल्या प्रणाली मधे मुलभुत बदल घडवुन आणण्याची गरज आहे । अमेरिका व इंग्लड प्रमाणे आपल्या कडेही फक्त दोनच राजकीय पक्ष असावेत असे वाटु लागलय।
या सर्व जेष्ठ संसदपटुंना आता पुढल्या निवडणुकीत मत देता कामा नये।
नविन, तरुण खासदारांनी आता यांची जागा घेण्याची वेळ आली आहे।

गंमत जंमत

तर मग राजाभाऊ हे सरकार तरणार तर। एकंदरीत तशी लक्षण कालपासुन दिसायला लागली आहेत नाही का ? आणि काय हो तुम्ही आपल्याच शेपटीचा पाठलाग करणारा कुत्र्याला पाहिले आहेत का ? कसा गोल गोल आपल्याचा जागी फिरत असतो ना ।

Monday, July 21, 2008

आनंद

काय हो राजाभाऊ , राजकारणात पदे मिळाल्याचा आनंद काही और असतो नाही का ?

हो ना ! काही जण हत्ती वरुन साखर काय वाटतात , तर काही जण भर रस्तात दोन्ही कडची वहातुक थांबवुन हजारी फटाक्याच्या माळ्याच्या माळा फोडून साजरे करतात, १५-२० मिनिटे यांचा आनंद लोकांनी डोळे भरून पहावा या हेतूने आणि मग म्हणुन सर्वांनी ताटकळत उभे रहावे ।

परत येवढ्यावर त्यांचे समाधान होत नसते , मग दुसरया दिवशी वाजत गाजत मिरवणुका काढल्या जातात, विभागभर त्यांची पोस्टर्स लावली जातात काय काय म्हणुन ही लोक करत असतात , प्रकाशझोतात रहाण्यासाठी ।