Sunday, August 10, 2008

नशा सुरांची - जोहराबाईंच्या आवाजाच्या जादुची


या श्रावणातील पावसाळी मदहोशी वातावरणात "नशा" हवीच. कोणाला नशेसाठी सुरे च्या आहारी जावेसे वाटते तर माझ्यासारख्या दिवाण्याला सुरांची नशा हवेहवेशी वाटते.

सुरांनी भारावुन जायला या धुंदभुंद वातावरणात कोणाला ऐकायचे ? कोणती गाणी ऐकायची हे त्या त्या वेळेच्या मनाच्या तरल अवस्थेवर काहीसं अबलंबुन असते. कधी नुरजंहाशी जवळीक साधावीशी वाटते "आ घटा काली घाटा अबके बरस ना बरस , मेरे प्रितम परदेश " तर कधी लता रुलावुन जाते.

लेकीन आज मन बडा जिद कर रहा था "जोहराबाई अंबालावाली" ची गाणी ऐकण्याची. एकापेक्षा एक अनेक सुरेल गाणी त्यांनी गायली आहेत.

सामने गली मे मेरा घर है, पता मेरा भुल ना जाना - मिर्झा सायबान
सुनोजी प्यारी कोयलीया बोले - संन्याशी
चले गये चले गये दिल मे आग लगाने वाले चले गये - पहले आप
मोरी बाली उमरीया - नतीजा
कौन जीवन मे मेरे - हमारा संसार.
हे झाले मनाचे चोचले.
य रंगील्या माहोल मधे मग कधीतरी "कांद्याची भजी " होवुन जावु द्या ही फरमाईश करावी लागते.

No comments: