Friday, August 08, 2008

आज ०८-०८-०८ आणि वजनाचा काटा ८० ला टच

काल अस्म्मादिक चक्क बस पकडण्यासाठी चांगलेच अंतर धावले। सहा - सात महीन्यापुर्वी ही एक अश्यक्य कोटीतली घटना होती ।
९२ किलोचे धुड , हले दुले , गजगती चाले , साधे चालतानाही धापा लागायची मग धावणे तर दुरच।
हे परिवर्तन घडलेच कसे ?
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे। पण हे करायचे असते ते कोणीतरी सांगायला हवे व कसे करायचे तेही।
हे काम केले दोन ब्लोगर्सनी। वैशाली आणि संगीतानी, त्यांची प्रेरणा व मार्गदर्शन।
भरपुर चालणे व ह्विगन आहाराशैली यांनी अखेर कमाल करून दाखवलीच ।
एक जमाना असा होता वाढलेल्या वजनाबरोबर मिळालेल्या सर्व व्याधि मागे लागल्या होत्या , सदैव दुर्मुखलेला, कंटाळलेला, नैराश्येने पछाडलेला, नकारात्मक विचाराने भारलेला, सारे मानसिक रोग , शारीरिक व्यथा घेवुंन रडत रखड्त दिवस पार होत होते ।
पण आता
आयुष्य किती सुंदर आहे।

5 comments:

Anonymous said...

छान. कॉंग्रॅच्युलेशन्स. असेच हेल्दी जीवन जगा अशी आपल्याला शुभेच्छा. ज्यांनी आपल्याला प्रेरणा दिली त्यांचेसुद्धा ब्लॉग वाचायला आवडतील.

Jaswandi said...

oh gr8!
n pudhachya prayatnansathi all the best!

कोहम said...

abhinandan....paN swatahala puDhache laKshya dya.....thaaMbu naka......lavakar 75 la touch cha blog liha

HAREKRISHNAJI said...

कोहम ,

धन्यवाद.

आपण माझ्या मनातला आकडा सांगितलात. वर्षाअखेरचे माझे हे लक्ष आहे.

HAREKRISHNAJI said...

राजस,

धन्यवाद. त्यांचे ब्लॉग ची नावे अशी आहेत.

http://kasakaay.blogspot.com/
http://lopamudraa.blogspot.com/

जास्वंदी,

आपण माझ्या बॉगवर नियमीत कॉमेंटस देतात त्याने लिहीण्यास हुरुप येतो.