त्या डायटॆशीयनची म्हटले जराशी गंमत करुया.
- माझी वजन कमी करण्याची इच्छा आहे काय आहार घेवु ?
- अमुक तमुक खा वगैरे वगैरे
- मी व्हिगन आहे. व्हिटॅमीन B१२ च्या कमतरतेसाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करु. ( गुगली )
- तुम्ही दुध घ्या, पनीर चा वापर करा, अंडी पण खावु शकता.
- सपशेल नापास.
एका प्रख्यात औषधे बनवणाऱ्या कंपनीनी काही महिन्यापुर्वी एक प्रामुख्याने डायबेटीस व हृदयरोग आदी विषयांवर एक नेहरु सेंटर मधे शिबीर आयोजीत केले होते. त्यातला हा किस्सा.
व्हिगन जिवनशैली बद्द्ल अजुनही आपल्या कडॆ अज्ञानच आहे अगदी वैद्यकीय क्षेत्रातील माणसांनी मला व्हीगन डायट म्हणजे काय ? हा प्रश्न विचारला आहे.
3 comments:
हे मात्र खरे आहे.
लोक सर्रास दूध,पनीर, अंडी खा असा सल्ला देतात.
मला तर खूपदा कंफ़्युजन असतं यांना नक्की वजन कमी करायचा सल्ला द्यायचा आहे, की पोषण /आहार मूल्यांचा की पेशंटला बरे वाटावे म्हणून ते असं म्हणतात कोण जाणे!
हो ना.
त्यात गंमत अशी की व्हिगन डायट मधे हे पदार्थ निशिद्ध आहेत. मुळातच व्हिगन आहारशैली यांना ठावुक नाही.
हरेकृष्णाजी,
भारतातील वैद्यकिय क्षेत्रातले लोक या विषयावर फारच अज्ञानी आहेत. यांच्यामुळेच भारताला हृदयरोग, मधुमेहासारख्या रोगांची जागतिक राजधानी बनला आहे.
अमेरिकेत फिजिशियन्स कमिटी फॉर रिस्पॉन्सिबल मेडिसिन सारख्या संस्थांनी सर्वांना जागरूक करण्याचे काम केले आहे, त्यामुळे डॉक्टरांपासून रेस्टॉरेंटसमधल्या वेटर पर्यंत बहुतेकांना व्हिगन म्हणजे काय ते माहिती असते.
भारतातही हळूहळू हे काम करणारे लोक तयार होत आहेत. नुकतीच मी ड्रेस्डन, जर्मनी येथे वर्ल्ड व्हेजिटेरियन कॉंग्रेसला गेले होते. तेथे डॉं. नंदिता शहा यांचे भाषण ऐकण्याचा व त्यांना भेटण्याचा योग आला. त्या "पिज वर्सेस पिल" या वर्कशॉपच्या माध्यमातून भारतात लोकांमधे आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करत आहेत.
२० सप्टेंबरला त्यांचे मुंबईत वर्कशॉप आहे. त्याबद्दल अधिक माहिती इथे मिळेल.
http://www.sharan-india.org
B१२ वर भारतिय वाचकांना उपयुक्त ठरेल अशी माहिती मला अजुन मिळालेली नाही, परंतू डॉ. नंदिता शहा यांच्याकडून आपल्याला नक्कीच योग्य मार्गदर्शन मिळू शकेल.
Post a Comment