आपली बायको जे काही म्हणते त्याला मान डोलवायची जरी सवय असली तरी कधीतरी खरचं तिचे म्हणणे पटते.
बटाटा वड्या बरोबर चटणी खाण्याची आपली एक पध्दत. पण आज राजाभाऊंना बटाटावडा हा दुय्यम वाटत होता आणि मग ते चटणीसोबत तोंडी लावायला बटाटा वडा खाण्यासाठी गोरेगावच्या "सप्रे" मधे गेले. पुर्वी कधीतरी वीसपंचवीस वर्षापुर्वी येथे खाल्लेला वडा त्या सोबतच्या चटणी मुळे लक्षात राहिलेला. दही, खोबरे, मिरची, कोथींबीर, लसुण.
"पुर्वी सारखी चव राहिलेली नाही. चटणीची मजा नाही "
राजाभाऊंनी मान डोलावली, जादा ची मागवलेली चटणी चमच्या चमच्याने खाता.
No comments:
Post a Comment