पुरणपोळीच्या फोटोवर सुरंगा दाते यांनी आपल्या शैलीत एक चविष्ट, मिठ्ठास असलेली सुंदरशी कविता केली आहे.
चटके बसत असून
जीव ओतून
स्वतःला शिजवणारी चण्याची डाळ,
पोटच्या कटाला आमटीच्या गावी
पाठवल्याचा विरह ,
आणि केवळ सण आहे म्हणून
स्वतःला गुळात झोकून देउन
एकरूप होणे ,
वेलची जायफळ मंडळींची टीका ऐकणे,
आणि सरते शेवटी तलम रेशमी वस्त्रात स्वतःला मढवून
सख्यान्सकट बसणे …
पण आयुष्यात काही स्वस्थताच नाही .
कुणी एक राजाभाऊ व्हिलन म्हणून येतात काय ,
एकीचे हरण करतात काय
आणि
बघता बघता ती नाहीशी होते काय …
डब्यात पोळ्यांची संख्या कमी दिसताच
काळे काकु काय ते समजतात .
तरीच
आदल्या दिवशी
त्यांना भेटायला आलेल्या
पुरणपोळी बचाव समितीच्या शिष्ठ मंडळाची आठवण होते.
काय करणार,
दरवर्षी राजाभाऊ ना
पुरणपोळी संशोधन कमिटीच्या
चेअरमनपदाची पोस्ट द्यावीच लागते
Suranga Daté
No comments:
Post a Comment