त्या दोन परदेशी युवतींनी दोन्ही हात जोडुन राजाभाऊंना अभिवादन केले, राजाभाऊ चक्रावले, अरे आपण "अतिथी देवो भव " करत ह्यांना वेलकम करायचे की ह्यांनीच आधी हात जोडायचे.
मग त्यांच्या वय होत चाललेल्या डोक्यात प्रकाश पडला, देवाच्या दरबारी सर्वच समान. राजाभाऊ त्यांचे अनुकरण करत त्यांना विनम्रभावाने प्रणाम करुन म्हणाले
"हरे किश्न, हरे क्रिश्न"
परत तोच शनिवार, गेल्या आठवड्यामधे होता तसाच, तीच वेळ, गाडी उभी करायला पण सापडलेली तीच जागा, तेच उपहारगृह, तेच टेबल, त्याच खुर्च्या, तेच सात्विक भोजन, तेच दम आलु काश्मिरी, तेच बटर कुलचे, तशीच बोटे चाटणे, आणि सोबत समोर बसलेली तीच. ( दुसरी कोण हवी होती हो राजाभाऊ तुम्हाला समोर बसायला ? )
का कोण जाणॆ इस्कॉन मधल्या "
गोविंदा" कडे काही वर्ष दुर्लक्ष झाले होते खरे मग कदाचित ह्या अपराध भावनेने राजाभाऊ परत "गोविंदा" मधे भोजनास गेले. सात्विक आहार खाण्यासाठी. ह्या वेळी दुसरी कोणतीतरी भाजी मागवावीशी वाटत होती, पण नाही मागवली.
No comments:
Post a Comment