Thursday, March 17, 2022

विनायक केशव आणि कं

 विनायक केशव आणि कं. वाले नक्कीच मनात म्हणत असणार, हा माणुस वेडाबिडा नाही ना ? आत्ता थोड्‍या वेळापुर्वी येवुन गेला, एक अर्धा डझन पुरणपोळ्या बांधून घेतल्या , एक गरमागरम पोळी हातात घेवुन रस्त्यावर उभ्याउभ्या खाल्ली , घरी गेला काय नी परत डझनभर पोळ्या न्यायला आला काय. परत तोच सीन. त्याच पोळ्या बांधुन, एक तव्यावरुन तडक हातावर आलेली पुरणपोळी घेवुन>

काय करणार, दुकानातला माहौलच तसा होता. रहावले नाही. आत दुकानात अखंड यज्ञ जो सुरु होता , 

मग आपल्या पोटामधल्या धगधगत्या यज्ञकुंडात त्या पुरणपोळ्यांच्या आहुती पडायला नको ?






No comments: