तसं बघायला गेलं तर हे कधी कधी अगदी गरजेची बनलेली असते. केव्हा केव्हा जेष्ठांना पुढच्या पिढीला कधीतरी दणका द्यावा लागतो, दाखवुन द्यावे लागते की खरा बॉस कोण आहे ते. दाखवुन द्यावे लागते मी जरी आता आजोबा झालो असलो तरी या पेढीचा मीच मुळपुरुष आहे. मग आज राजाभाऊंनी निक्षुन सांगितले ,मला हीच जागा हवी, ह्याच जागेची मी केलेली निवड सर्वांनी मान्य करायला हवी.
हे असे कडक बोलणे ऐकुन सारे कसे सुतासारखे सरळ आले आणि राजाभाऊंच्या आवडीच्या जागी, वरळीच्या कॉपर चिमणी मधे आज रात्री जेवायला गेले.
मकई मलाई शीक कबाब, चिकन कालीमिर्च कबाब, चिकन बिर्याणी वर ताव मारतांना ह्या पोरांची कुजबुज राजाभाऊंच्या कानी आले व मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला, ह्या मुलांनी आपल्याला बनवले, मस्त युक्ती लढवली व आपल्याला याच जागेची निवड करणे भाग पाडले, ह्यांनी आपल्याला असे काय दाखवुन दिले की ही निवड जणु तुमचीच आहे..
ठिक आहे. फारसा फरक पडलेला नाही. आपल्याला काय दम आलु आणि काबुली नान खाण्याशी मतलब. ह्या खाण्याने आपले मन जिंकले ना मग बास झाले.
मग वरती बोनस म्हणुन "मुच्छड पानवाला " कडचे मघई.
No comments:
Post a Comment