राजाभाऊंचे आता वय होत चालले. गर्दी, गडबड गोंधळ, आरडाओरडा आता नाही सहन होत. अलिकडे गर्दीच्या ठिकाणी पुर्वीसारखे गल्लीबोळ पालथी घालणे फारसे जमेनाशे झाले आहे.
आज क्रॉफर्ड मार्केट , मुसाफीरखान्याच्या समोरचे, आजुबाजुचे रस्ते संध्याकाळी खरेदीसाठी फिरफिर फिरणे फार तापदायक होवुन गेले होते.
राहत एकच होती, जवळचे "बादशाहा " आणि त्यांचा "रॉयल फालुदा.
केवळ ह्या एका गोष्टीसाठी हे सारे राजाभाऊंनी सहन केले, नाहीतर काळेकाकुंची आज काही खैर नव्हती.
क्रॉफर्ड मार्केटला खरेदीला गेल्यानंतर " बादशाहा " मधे फालुदा पिण्यासाठी न जाणे म्हणजे अर्धा जन्म वाया घालवण्यासारखे.
आजुबाजुला बसलेल्यांनी मागवलेल्या पावभाजीच्या मुळे त्यांच्या मनात लालसा निर्माण झाले. ( नसती मागवली असती तरी चालण्यासारखे होते,
काकुंसाठी खास दहीवडॆ.
No comments:
Post a Comment