Tuesday, March 15, 2022

आता आपला नवरा तोंड आणि हात पोळूनच घरी परतणार

 सुट्टीच्या दिवशी सक्काळी सक्काळी फेसबुकावर लोळत पडलेला आपला आळसावला नवरा अचानक उठुन "आलोच" करत थेट घराबाहेर पडतो तेव्हा तो कुठे गेला असेल हे न समजण्या इतपत ती दुधखुळी आहे असे नवऱ्याला का वाटत असावे ? 

आता आपला नवरा तोंड आणि हात पोळूनच घरी परतणार याची तिला खात्री नक्कीच असणार.

अर्थातच त्याचे तरी काय चुकले म्हणा. गेले कित्येक दिवस त्याला गिरगावातले "विनायक केशव आणि कं. " साद घालत होते. तीनदा राजाभाऊ गेले असतांना ते बंद होते, चवथ्यावेळी त्यांच्या मुलीनी त्यांच्या वाढता वाढे वजनाकडे बघुन बोंब मारली आणि त्यांना गप्प बसवले होते.

घरच्यांसाठी पुरणपोळ्या घेवुन झाल्या, सध्या आजच्या सकाळ पुरत्या. 

मग समोरचे दृश्य पाहुन ते वेडेपिसे झाले. कोणी पुरणपोळ्या लाटतयं, कोणी तव्यावर भाजतयं, साऱ्या आसमांतात होळीच्या माहोलचा एक सुगंध भरुन राहिलेला.



रस्तावर एका कागदावर गरमागरम , तव्यावरुन थेट हातात पडलेली पुरणपोळी खातांना, एका हाताला चटके लागल्यामुळे ती दुसऱ्या हातात फिरवणाऱ्या, तोंड पोळत असतांना देखील खाण्याच्या गतीत भंग न पावलेल्या कोणा एकाचे रुप दिसले तर खुशाल समझावे, हेच ते राजाभाऊ.

आता उद्या सकाळला. पुरणपोळ्या आणि तेलपोळ्यांसाठी गिरगावातले "विनायक केशव आणि कं"




No comments: