इडली हाऊस मधे गेल्या नंतर जर का इडल्या कमीच खाल्या गेल्या असतील तर त्याला सर्वस्वी कारणीभुत महेंद्र काकाच.
आता त्यांनी नागपुरवरुन आणलेल्या संत्र्याच्या बर्फीवर ताव मारला तर दुसरे काय होणारे होते ? मग आता येथे गेलोच आहोत तर मग मागवुया करत नानाविध प्रकारच्या इडल्या मागवल्या गेल्या.
गेल्यावेळी रामाश्रय मधे खायला गेलो होतो. या वेळी ते नकोसे झाले . कारण एकच तेथली महाप्रचंड गर्दी. मग कोणीतरी (जे आज नाव सुचवुन , सगळ्याना उचकवुन स्वःत आलेच नाही तो भाग वेगळा ) इडली हाऊस व तेथे मिळणाऱ्या इडल्यांबद्दल सुचवले.
मग काय , अगदीच शटर उघडायला नाही बऱ्यापैकी लवकर श्री. प्रमोद देव, श्री. महेंद्र कुलकर्णी, श्री. भारत मुंबईकर आणि राजाभाऊ माटुंग्याला पोचले.
कांचीपुरम, काळीमिरी इडल्यांपासुन ज्या ज्या इड्ल्या आज सकाळी तयार होत्या त्या मागवुन झाल्या, सोबत चटण्या, रसम, ताजे ताजे भाजीचे लोणचे, मुल्गापुडी, तेलपुडी , तिळाचे तेल टाकुन.
जशी या येथली सुरवात कापी पासुन झाली होती त्याच कापी ने शेवटही झाला
No comments:
Post a Comment