Wednesday, March 09, 2022

प्रभात रोड वर असलेल्या "स्वरुप " मधे

 सारे काही केवळ भाकरी किंवा सहा भाकऱ्यांसाठी.

प्रभात रोड वर असलेल्या "स्वरुप " मधे मिळत असलेल्या भाकऱ्यांची बडी तारीफ राजाभाऊंनी रात्री ऐकली आणि लगेचच दुसऱ्या दिवशी दुपारला तेथे जेवायला सहकुटुंब सहपरीवार पोचले.  

येथे मिळणारी भाकरी फुलक्यांसारखी असते, मऊ, मुलायम वगैरे वगैरे,  त्या सोबत मटकीची भाजी, पिठले इ. 

आता भाकऱ्यांबद्द्ल एवढे ऐकल्यानंतर मग त्यासोबत कोणत्या भाज्या खाव्या हा मुद्दा गौण होता. ज्वारीच्या भाकऱ्या खरोखरीच मस्त होत्या. आता त्या सोबत काही तरी भाज्या खाल्या पाहिजेत म्हणुन मग मटकीची भाजी, पिठले आणि बटाटा रस्सेदार भाजी. शेवटी अर्थातच चिंचगुळाची आमटी आणि भात.








No comments: