राजाभाऊंना काहीतरी सणासणीत तिखट खावेसे वाटते आहे किंवा सोडा-जिंजर मारामारी प्यावीशी वाटते आहे. किलोभर तरी आलेपाक कदाचित मदतीला येवु शकेल.
जवळजवळ बारा प्रकारचे आईसक्रीम, ते घेण्यासाठी ताट, वाटी च्या ऐवजी चक्क भला मोठाला ठेवलेला ग्लास. लालचेपोटी सर्वांचीच चव तर घ्यायचीच होती, प्रश्न फक्त एवढाच होता की कोणत्या क्रमाने ?
मग त्यांनी प्रत्येकी थोडे थोडे आईसक्रीम ग्लासात भरले आणि त्यांचा योग्य तो आस्वाद घेतला. एका वेळी एका चवीचे. ही चवींची सरमिसळ चांगलीच भावली.
कोर्टयार्ट मेरियट्स मधल्या मोमो कॅफेचे जेवण हे राजाभाऊंना नेहमीच भुरळ घालत आलेले आहे मग ते अंधेरीतले असो की पुण्यातले.
खरं म्हणजे त्यांनी आज अगदी ठरवले होते की ह्या डेसर्ट्स कडे अजिबात ढुंकुन सुद्धा बघायचे नाही. पण काय करणार, आदतसे मजबुर. मग काय अगदी आडवा हात.
ता.क. ही पोष्ट तिच्या नजरेत येणार नाही अशी आशा.
No comments:
Post a Comment