ज्याचा तुम्ही ध्यास घेतलेला असतो ती गोष्ट तुम्हाला मिळेलच असे नाही, अगदी त्याच्या दारात पोचुन सुद्धा. आणि आज त्यात महिला दिन नाहीतर खाण्याच्या बाबतीत दुराग्रही असलेल्या राजाभाऊंना आपल्या अट्टाहासाला मुरड कशासाठी घालावी लावली असती ?
ज्याची एवढी तारीफ ऐकली आहे त्या "झामा" आणि "विग" मधे खायला राजाभाऊ सपरीवार गेले खरे पण ह्याच मुळे ते फसले. एवढ्या लांब सिंधी कॅम्प मधे जावुन सुद्धा तेथे त्यांना खायला मिळाले नाही. काय करणार, मॅडम आणि युवराजांना तेथला माहोल एकतर पसंद आला नसावा किंवा त्यांना केवळ गुरुकृपाचेच वेध लागले होते.
आता आजच्या ह्या महिला दिनाच्या दिवशी कशाला उगीचच तिचे मन मोडायचे म्हणुन मग ते तसेच दारातुन निघाले आणि गुरुकृपा मधे पोचले.
No comments:
Post a Comment