असे का ?
काही काही गोष्टी आपल्या एवढ्या सवयीच्या झालेल्या असतात, इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की त्यांचे जसे अस्तित्व जाणवत नाही त्याच प्रमाणे त्यांचे नाहीसे होणे ही कळत नाही.
फार पुर्वी मुंबईमधे होमगार्डस रोज सकाळी बरोबर दहाच्या ठोक्याला भोंगे वाजवत असत. मग नंतर कधीतरी ती वेळ बदलुन नऊची झाली. सायरन चांगल्या अवस्थेत आहेत की नाहीत, ते बरोबर वाजताहेत का नाही याची चाचणी रोज घेतली जायची. सायसनचा हेतु शहरावर आलेल्या संकटाची माहिती लागलीच सर्वांपर्यंत पोचावी असा असावा. या भोंग्यावर काहींची दिनचर्या सुरु व्हायची, घडयाळाची वेळ जुळवली जायची .
भारत पाकिस्तान युध्दाच्या काळात शत्रुपक्षाच्या विमानहल्लाची सुचना देण्यासाठी हे रात्रीच्या वेळी वाजवले गेले की बदलणारे वातावरण अजुनही आठवते.
हल्लीच्या काळात होमगार्डस अस्तित्वात आहेत की नाही हेच कळत नाही, मग सायसन गायब झाले त्याचे काय नवल ?
हा सायरन बंद होवुन किती वर्षे झाली असतील ?
कोणास ठावुक.
3 comments:
दहावीला असताना एक कविता होती मराठीला ... ‘पाखरांनो तुम्ही’ नावाची. रोज भोंगा वाजतो तेंव्हा तुम्ही काय करता अशी एक ओळ होती त्यात :)
संपुर्ण कविता लिहा ना
संपूर्ण कविता आठवत नाहीये, कवीचं नावही आठवत नाहीये :(
रोज दहाचा भोंगा वाजतो तेंव्हा आम्ही आमची घड्याळं लावतो - पाखरांनो तुम्ही काय करता? अशी काहीतरी होती ती ओळ.
शहरी वातावरणामध्ये, प्रदुषण, गोंगाट अश्या जगात पाखरं कशी जगत असतील असा विषय होता कवितेचा.
Post a Comment