Tuesday, February 23, 2010

जिहाद - लेखक - हुसेन जमादार

"एखाद्या ध्येयाच्या सिद्धीसाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावणे व जिवाच्या आकांताने प्रयत्न करणे म्हणजे "जिहाद" होय. ’जिहाद’ म्हणजे केवळ धर्मयुद्ध नव्हे." - पुस्तकामधुन साभार

हुसेन जमादार लिखीत "जिहाद " वाचले. हे त्यांचे आत्मचरित्र. हुसेन जमादार हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे पुर्णवेळ कार्यकर्ते. हमीद दलवाईंचे साथी. संपुर्ण आयुष्य प्रबोधनाच्या कार्यक्रमाला विधायक कामाची जोड देत काढलेलं.

एकीकडे लाखोंकरोडो धर्मांध तर दुसरी कडे हे असे मुठभर समाजाचा विचार करणारे.

केवळ या मुठभर लोकांमुळॆच समाजपुरुष आपला तोल सावरुन आहे. हे मुठभर लोक म्हणजे तुला करतांना एका बाजुच्या तागड्यात टाकलेले एक छोटुसे तुलशीपत्र.

2 comments:

Ruminations and Musings said...

pustak changale aahe..

HAREKRISHNAJI said...

सुरवातील जरासे कंटाळवाणे वाटले. त्यांचे कार्य जबरदस्त आहे. त्यांना भेटण्याची इच्छा आहे