Monday, February 08, 2010

बाजागाजा आणि " रॉयल ऑर्कीड सेंट्रल "

गाना, बजाना,  आणि खाना. 

गानाबजाना ये तो राजाभाऊकी बस की बात नही है ! आता राहीले "खाना" , ते तर "बाजागाजा" ला जाण्यापुर्वी झालेच पाहिजे , त्या शिवाय मजा नाही, सारा दिवस ईशान्य मॉल, पुणॆ मधे जो या "बाजागाजा" महोत्सवात घालवायचा होता.

Pinxx ,  कल्याणी नगर , पुणॆ मधल्या रॉयल ऑर्कीड सेंट्रल मधले कॉफी शॉप. येथे बुफ जेवण मस्त मिळते, दोनचार वेळा येथे जेवल्यानंतर त्याची चटक जी लागली आहे. त्यात "एका वर एक फुकट, दोघे जेवा व एकाचेच बील भरा " ही योजना येथे सुरु असल्याचे तेथे गेल्यानंतर कळले. मग काय.

आजचे आकर्षण होते श्रीलंकेचा एक खाद्यपदार्थ.  परोठ्याचे बारीक बारीक तुकडॆ केलेले. मग ते पॅन मधे बटरमधे कांदा, टॉमेटो, सिमला मिर्ची टाकुन परतले , त्यात दोन प्रकारच्या गेव्ही टाकुन मग परोठ्याचे तुकडे टाकले, वरती काही मसाले.  खातांना मजा आली.

No comments: