Wednesday, February 24, 2010

रुढी, पध्दत , अंधश्रद्धा इ.

शेजारच्या आजीबाईंचे विचार ऐकुन राजाभाऊंना जबरदस्त धक्का बसला.

पध्दत कशी पडते याचे त्यांनी एक उदाहरण दिले.

लग्नघरात ऐन मांडवात एक मांजर येवुन मेली,  अपशकुन झाला असे उगीचच कुणाला वाटु नये, ते मांजर मेल्याचे कोणाच्या लक्षात न येवु नये म्हणुन वरमायनी त्यावर एक टोपले ठेवले. टोपले ठेवतांना त्यांच्या थोरल्या सुनबाईने पाहिले.

सुनबाईने आपल्या मुलाच्या लग्नात एक मांजर पकडुन आणली, तिला ठार मारले व मंडपात तिच्यावर टोपले ठेवुन तिला झाकुन ठेवले.

लोकांनी विचारले " काय हा प्रकार"

"अहो, आमच्यात तशी पध्दत आहे " , सुनबाईंनी उत्तर दिले.

4 comments:

Mugdha said...

slapstick humor :)

HAREKRISHNAJI said...

आजीबाईंनी कोणीतरी घरात शंखशिंपले ठेवु नये ते बाईट असते हे सांगितल्यावर त्यांनी या खुळचटपणावर तिला फार झाडले.

Anonymous said...

haha...shakya ahe he...

क्रांति said...

भारी!